Home मराठवाडा जनतेच्या कोरोना संदर्भात अडचणी सोडविण्यासाठी जालना पेालीस दलाची हेल्पलाईन कार्यरत

जनतेच्या कोरोना संदर्भात अडचणी सोडविण्यासाठी जालना पेालीस दलाची हेल्पलाईन कार्यरत

152

सय्यद नजाकत

जालना दि. 26 – कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपुर्ण देशात 21 दिवसा करीता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तुच्या आस्थापना चालु राहणार आहेत. कोणासही विनाकारण घराबाहेर निघण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. ज्या नागरीकांनी काही अडचण, मदत हवी असल्यास किंवा काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतीसाठी जालना जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणीसाठी किंवा ज्यांना जिल्ह्याबाहेर जायचे, घराबाहेर निघायचे असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर कॉल करुन आपली अडचण सांगावी, त्यांची अडचण सोडविण्यात येणार आहे. त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारण संयुक्तीक असल्यास परवानगीचे पत्र त्यांचे मोबाईल क्रमांक व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येईल.
हेल्पलाईन क्रमांक-1 (+91 9356720079), हेल्पलाईन क्रमांक- 2 (+ 91 9356722691), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-225100),नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-224833), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (100). या हेल्पलाईन सेंटरच्या प्रमुख – सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक सखु राठोड यांना नेमण्यात आलेले आहे.
—–*-