Home मराठवाडा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, जिल्हाधिकारी , रविंद्र बिडवे

पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, जिल्हाधिकारी , रविंद्र बिडवे

180
0

कोरोना मुकाबला करण्यासाठी

नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

सय्यद नजाकत

जालना, दि. 26 – जिल्ह्यामध्ये दि. 23 मार्च 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये 5 पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली आदी ठिकाणी थांबु नये. शक्यतो घरीच थांबावे, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील किराणा मालाच्या दुकाना पुर्णवेळ सुरु राहतील. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तु जसे फळे, भाजीपाला, दुध, अंडी, मांस इ. च्या दुकाने व आस्थापना नेहमीप्रमाणे सुरु असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आवश्यक बाबी विनाकारण गरजेपेक्षा जास्त खरेदी करु नये अथवा त्याचा साठा करुन ठेवू नये, जेणे करुन जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होणार नाही. शासकीय कर्मचारी नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग आपल्या सोबत असुन कारोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिला आहे.

जनतेला कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 02482-223132 या क्रमांकावर फोन करावा. मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातुन आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवर जाऊन आपली संपुर्णपणे खरी माहिती भरावी. जेणेकरुन आपल्याला योग्य ती मदत करु शकु.

जालना जिल्ह्यामध्ये दि. 26 मार्च 2020 रोजी 1 रुग्ण नव्याने दाखल झाला आहे. आतापर्यंत एकुण 60 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 58 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत व त्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी 7 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 104 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 97 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 212 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण 15 संस्था अलगीकरणासाठी निवडल्या असुन त्यामध्ये 1531 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-*-

जनतेच्या कोरोना संदर्भात अडचणी सोडविण्यासाठी

जालना पेालीस दलाची हेल्पलाईन कार्यरत

जालना दि. 26 – कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपुर्ण देशात 21 दिवसा करीता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तुच्या आस्थापना चालु राहणार आहेत. कोणासही विनाकारण घराबाहेर निघण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. ज्या नागरीकांनी काही अडचण, मदत हवी असल्यास किंवा काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतीसाठी जालना जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणीसाठी किंवा ज्यांना जिल्ह्याबाहेर जायचे, घराबाहेर निघायचे असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर कॉल करुन आपली अडचण सांगावी, त्यांची अडचण सोडविण्यात येणार आहे. त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारण संयुक्तीकअसल्यास परवानगीचे पत्र त्यांचे मोबाईल क्रमांक व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येईल.

हेल्पलाईन क्रमांक-1 (+ 91 9356720079), हेल्पलाईन क्रमांक- 2 (+ 91 9356722691), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-225100),नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-224833), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (100). या हेल्पलाईन सेंटरच्या प्रमुख – सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक सखु राठोड यांना नेमण्यात आलेले आहे.