Home उत्तर महाराष्ट्र राजूर पोलिसांनी पकडला घरातील भुयारी मार्गातून अवैध दारूचा मोठा साठा

राजूर पोलिसांनी पकडला घरातील भुयारी मार्गातून अवैध दारूचा मोठा साठा

128

राजूर प्रतिनिधी

अहमदनगर – राजूर पोलिसांची अवैध दारू व्यवसायावर धडक कार्यवाही.राज्यात संचार बंदी लागू असून देखील मोठा दारू साठा राजूर येथील शुक्ला याच्या घरातून झाला हस्तगत.संपूर्ण देशात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सारख्या महामारीच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक-डाऊनची घोषणा केली असल्याने राजूर पोलिसांनी राजूर गाव व आजूबाजूचा खेड्या गावांमध्ये आपल्या पोलिसी कर्तव्याचे दिवस रात्र पालन करत लोकांना घरच्या बाहेर न येण्याचे आव्हान करत असताना राजूर मधील काही समाज कंठक अवैध व्यवसाय करत आहेत.राज्यामध्ये संचार बंदी लागू असतांना अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ चालू असून असा कोण समाज कंठक आहे हा की जो बार चालक बंदीच्या काळात देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांना दारू साठा पुरवत आहे.या विक्रेत्यांवर ही कठोर कार्यवाही ची मागणी राजूर परिसरातुन केली जात आहे.मात्र राजूर मध्ये या अवैध व्यावसायिकांनी कमालच केली.चक्क एक नाही दोन नाही एकूण बारा ते तेरा देशी दारूचे बॉक्स पकडले.

यात आरोपी सुमन संजय शुक्ला,व तिचा मुलगा सुरज संजय शुक्ला यांच्यावर भा.द.वी कलम ६५ (इ) ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी फरार झाले आहेत.पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास नेहे,पोलीस नाईक देविदास भडकवाड,पोलीस नाईक विजय मुंढे,पो.कॉ.विजय फटांगरे,चालक पांडुरंग पटेकर आदी करत आहेत.तर यावेळी राहुल नगर मधील काही महिला व नागरिकांनी खूप मोठी मदत केली आहे.