April 1, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नांदा येथे ५५ तर बिबीत ३० व्यक्तींना होम क्वारंटाईन

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर – ग्रामपंचायत नांदा व जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे औद्योगिक वसाहती असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींनी सतर्कता दाखवत बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना घरच्या घरी राहण्याची सक्ती केली आहे. तोंडी सूचना तर दिल्यात अशा लोकांना नोटीस देऊन सुद्धा बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दोन्ही गावातील शासकीय वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित करून बाहेरून आलेल्या व्यक्तींची संपर्क साधला व त्यांना उपाययोजना सुचविल्या. वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक ट्रक चालक व वाहक नांदाफाटामध्ये अडकले आहे. नांदा ग्रामपंचायतीने बाहेरील काही लोकांसाठी भोजन व्यवस्था करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!