March 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र18 वर्षा पासून बंद ,

बदनापूर/सय्यद नजाकत

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्यावतीने बदनापूर या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र व कृषी महाविद्यालय असून असून बदनापूर केंद्रात संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विद्यापीठाने बीज प्रक्रिया केंद्र सुरु केले होते मात्र सदर केंद्र केवळ दोन वर्ष सुरु ठेवण्यात आलेले असून तब्बल १८ वर्षांपासून केंद्र बंद पडल्याने बीज प्रक्रिया केंद्र असून आधण नसून खोळंबा अशी परिस्थिती बनली आहे
परभणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची औरंगाबाद जालना महामार्ग बदनापूर रस्त्यावर ३५० एक्कर जमीन आहे,या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र चालविले जाते या केंद्रात जवळपास १५० अधिकारी,कर्मचारी नियुक्त आहे त्यांना राहण्यासाठी निवसथाने देखील आहेत मात्र एक हि अधिकारी,कर्मचारी या ठिकाणी राहत नाही ,या केंद्रामध्ये विविध जातीच्या बियाणे संशोधन केले जाते व संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया परभणी केंद्रात केली जात असे
विद्यापीठामार्फत सन २००० मध्ये बदनापूर या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरु करण्यात आले त्यामुळे प्राध्यपक वर्ग उपलब्ध झाला आणि बदनापूर संशोधन केंद्रात संशोधन केलेल्या बियाणांवर प्रक्रिया परभणी केंद्रात करण्याऐवजी बदनापूर येथेच करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेऊन कोट्यवधींची म्शणारी खरेदी केली व बदनापूर येथे बीज प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले सदर केंद्र साठी मोठी इमारत बांधण्यात आली व केंद्र सुरु झाले मात्र सदर केंद्र केवळ सुरवातीचे दोन वर्ष सुरु होते नंतर या केंद्राकडे कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांनी पूर्णतः द्रुलाक्ष केलेलं असून तब्बल १८ वर्षांपासून केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.
विद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुरु केलेलं बीजप्रक्रिया केंद्र बंद पडल्याने कोट्यवधी रुपये मातीत गेल्यात जमा असून बीज प्रक्रिया केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती बनली आहे मात्र विद्यापीठ देखील या बाबीला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसते,सध्या या केंद्राला कुलूप लागलेले असून चोहीबाजूने काटेरी झुडुपांनी वेडा घातलेला असल्याने लांबून तर जंगल दिसते मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर त्या ठिकाणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा बीज प्रक्रिया केंद्र असल्याचे उघड होते,सध्या सदर केंद्र कृषी महाविद्यलयाच्या ताब्यात असतांना देखील त्या ठिकाणी कोणतीच स्वछता केली जात नाही
——————————–
गिरीधर वाघमारे-प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर
बदनापूर कृषी संशोधन केंद्रात संशोधन केल्या जाणाऱ्या बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी सदर बीज प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले होते मात्र सदर केंद्रात आवश्यक प्रमाणात संशोधन होत नसल्याने केंद्र बंद पडलेले आहे,मागील काही वर्षात पाऊसाचे प्रमाण व इतर बाबीमुळे संशोधन कमी झालेले आहे व त्यामुळे त्या केंद्राचा वापर थांबलेला आहे

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!