June 3, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

परतुर शहरात संचारबंदी चा आदेश मोडणाऱ्यांना पोलिसांचा चोप !

पेट्रोल पंपावर लागल्या रांगा…!!

परतुर प्रतिनिधी – लक्ष्मीकांत राऊत

जालना – दुपारी संचारबंदी ची घोषणा मुख्यमंत्री यांनी केल्यानंतर ही संचारबंदी नेमकी कशी असेल याचा अंदाज नागरिकाना आला नव्हता, सायंकाळ पर्यंत शहरात रस्त्यावर बऱ्यापैकी वाहने वर्दळ दिसत होती, मात्र नंतर रस्त्यावर पोलिसांनी ताबा घेत नागरिकांना विनाकारण फिरू नका, घरात थांबण्याचे आवाहन करून ही जे लोक घोळक्यात दिसले त्यांना लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली, त्यानंतर मात्र शहरात संचारबंदी असल्याची लोकांना कल्पना आली.दुसरीकडे पेट्रोल सामान्य जनतेला मिळणार नाही याची चर्चा व्हायरल झाल्याने वाहनांच्या रांगा पेट्रोल डिझेल साठी पंपावर लागल्या.शहरात तीन तर चार किमी कक्षेत दोन पेट्रोल पंप असून या सर्व पंपावर सायंकाळी गर्दी झाली होती.
संध्याकाळी 8 च्या सुमारास पोलिसांनी शहरातील रेल्वे स्टेशन चौक,सिंगोना नाका,पोलिस स्टेशन चौक,दसमले चौक ,भाजी मंडई या नेहमी गजबजलेल्या ठिकानचा ताबा घेत घोळक्यात रिकामटेकडया लोकांना लाठीचा प्रसाद दिला, त्यानंतर शहर सामसूम झाले.विशेष पोलीस अधिकारी निलेश तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री 8 नंतर शहरात गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवून ठिक ठिकाणी तपासणी सुरू केली होती. शहरात आज प्रथमच लाऊडस्पीकर चा आवाजचं आलेला नाही, मशिदी वरील आजण चाही आवाज न आल्याने शहरात कमालीची शांतता पसरली होती. दिवसभरात अत्यावश्यक सामान भाजीपाला खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते, दुपारी संचारबंदी जाहीर झाली आणि त्यानंतर मात्र अनेकांची धांदल उडाली.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!