Home मराठवाडा आजच्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद , नागरिकांनी केला घंटानाद ,

आजच्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद , नागरिकांनी केला घंटानाद ,

111

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

कोरोना च्या पार्शवभूमीवर 22 मार्च रोजी अघोषित जनता संचारबंदी च्या आव्हानाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असून बदनापूर शहरासह तालुक्यातील नागरिक सकाळ पासून घरात होते तर सायंकाळी घरातच घंटानाद केला तसेंच आमदार नारायण कुचे यांनी सहपरिवार घंटानाद करून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले

कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातले असून शासन या रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील आहे ,आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता संचारबंदी चे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते

प्रशासनाच्या आव्हानाला बदनापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेत पडलेच नाही,घरात बसून नागरिकांनी कोरोना गो असा जप चालविला होता तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता,रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला तर सकाळी 9 वाजे पर्यंत नगर पंचायत कर्मचारी मात्र स्वछता करताना दिसून आले तर पोलीस कर्मचारी जागोजागी उन्हात आपली जबाबदारी पार पाडत होते

*******

आमदार नारायण कुचे यांनी सहपरिवार घंटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनता संचारबंदी संकल्पना अमलात आणण्यात आली त्यामुळे कोरोना रोगाला प्रतिबंध करण्याचा उद्देश काही प्रमाणात यशस्वी झाला,आव्हानानुसार सकाळी 7 वाजेपासून घरात बसलेल्या नागरिकांनी 5 वाजून 5 मिनिटाला घंटानाद करून स्वतः आमदार नारायण कुचे यांनी सहपरिवार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दवाखाने,नर्स,पोलीस,व इतरांचे आभार मानले