Home महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्यात 144 कलम लागू , लोकल , एस , टी...

महाराष्ट्र राज्यात 144 कलम लागू , लोकल , एस , टी , बस , खाजगी बस ही बंद ,

186

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ,

अमीन शाह ,

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लागू केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. लोकल सेवा बंद करण्यात आली असून खासगी बसेस, एस टी बसेस देखील बंद करत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. जनता संचारबंदीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानताना उद्धव ठाकरेंनी आपला कठीण काळ सुरु झाला आहे असं सांगितलं.
जनतेशी संवाद साधताना उद्दव ठाकरेंनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या जाणून घेऊयात…

रात्री ९ नंतर बाहेर पडू नका. अजून काळजी घ्या. जनता संचारबंदीसाठी दाखवलेला संयम सकाळी १० वाजेपर्यंत असाच कायम ठेवायचा आहे. आवश्यकता नसेल तर अजिबात घराबाहेर पडू नका.

व्हायरस गुणाकार सुरु करण्याची शक्यता आहे. पण आपण सर्वांनी मिळून वजाबाकी केली पाहिजे.

आज मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात १४४ कलम लागू. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असून पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नका.

आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.

रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.

अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील

शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.

आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.

ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.

३१ मार्च हा पहिला टप्पा आहे. गरज लागली तर पुढेही निर्णय कायम राहील.

सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद

अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण माणुसकी बाळगा. तळहातावर पोट असेल त्यांना मला सांगायचं आहे की, या संकटाने कोणालाही सोडलेलं नाही. ट्रम्पपासून सरपंचापर्यंत सगल्यांना ग्रासलं आहे. आपणच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहात. त्यांना जपणं सगळ्यांचं काम आहे. किमान वेतन चालू ठेवाला

जीवनाश्यक वस्तूंचा साठा करु नका. ही धान्याची दुकाने नेहमी उघडी राहतील. औषधं, अन्न धान्याचा पुरेसा साठा आहे. उगाच घरात साठवण्याची गरज नाही.

तुम्हा सर्वांची गैरसोय होत आहे याची कल्पना. मुबंईचं हे चित्र पहावत नाही. पण जीव महत्त्वाचा. संकट हे गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, जिद्द आणि संयम बाळगा.

Previous articleअक्कलकुवा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद ,
Next article
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.