Home महत्वाची बातमी अक्कलकुवा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद ,

अक्कलकुवा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद ,

89

जीवन महाजन ,

अक्कलकुवा शहरासह तालुकाभरात नागरिकांनी जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद देत कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेत करोनाला दुर सारण्यासाठी एकजुट दाखविल्याचे आज तालुक्यात दिसून आले.
अक्कलकुवा या प्रमुख शहरासह मोलगी,खापर वाण्याविहिर, या ग्रामीण भागातही जनता घरातच असल्याचे दिसून आले.प्रशासनाच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत कुणीही नागरिक बाहेर नव्हते, सर्व रस्ते निर्मनुष्य असे चित्र दिवसभर कायम होते प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने जोरदार समर्थन केल्याचे अक्कलकुवा तालुक्यात पहावयास मिळाले.सकाळी 7 वाजेपासून शहरातील सर्वच रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. तालुक्यातील सर्वच दुकाने बाजारपेठ स्वयं स्फूर्तीने बंद होते किरकोळ मेडिकल दुकाने व दवाखाने वगळता शहरच काय तर ग्रामीण भागात देखील सर्वच व्यवहार बंद होते.एरव्ही नेत्रंग शेवाळी महामार्गावरील शेकडो वाहनांची वर्दळ आज शांत होती.अक्कलकुवा बस स्थानकांतून एकही बस सुटली नसल्याने बस स्थानकात देखील शुकशुकाट पहावयास मिळाला जनतेने संचार बंदी स्वतःहून पाळली आहे, यावरून जनता कोरोनविषयी आता खुपच गंभीर झाल्याचे स्पष्ट होते.
एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे, गट विकास अधिकारी सी.के.माळी,पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे हे सतत गस्त घालुन जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी प्रयत्न शील होते.नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी अक्कलकुवा शहरात ठिक ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.एक दिवस आधीच तालुक्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी देखील जनतेला जनता कर्फ्युत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

*जिवन महाजन सह सुधिरकुमार ब्राम्हणे*
*अक्कलकुवा प्रतिनिधी*