Home महत्वाची बातमी रोगशास्त्र विभागातील संशोधनातील भारत सरकारचा युवा वनस्पती रोगनिदान तज्ज्ञ पुरस्कार प्रविण खैरे...

रोगशास्त्र विभागातील संशोधनातील भारत सरकारचा युवा वनस्पती रोगनिदान तज्ज्ञ पुरस्कार प्रविण खैरे यांना प्रदान ,

142

सय्यद नजाकत

बदनापूर, दि. 21 : येथील एकासर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने वनस्प्ती रोगशास्त्र विभागातील संशोधनातील भारत सरकारचा मानाचा समजला जाणारा युवा वनस्पती रोगनिदान तज्ज्ञ हा पुरस्कार प्रदान पटकावल्याबददल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बदनापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रवीण बाबासाहेब खैरे या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कठोर परिश्रम घेऊन हा पुरस्कार मिळविला. केंद्र सरकारच्य जैवतंत्रज्ञान विभागातर्फे आग्रा (उत्तर प्रदेश) येथे मागील आठवडयात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले होते. या ठिकाणी प्रवीण खैरे याला युवा वनस्पती रोगनिदान तज्ञ हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. खैरे हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे वनस्प्ती रोगशास्त्र विभागामध्ये पीएच.डी. करत असून त्याने कृषी क्षेत्रातील वनस्पतीमधील रोगाचे निदान व त्यावरील उपाय या बाबत केलेल्या अभ्यासाबाबत व संशोधनाबाबत हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बदनापूर सारख्या ग्रामीण ठिकाणच्या या विद्यार्थ्याने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी केलेल्या कामाबददल या अगोदर राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विविवध 7 पुरस्काराने गौरावान्व्ति करण्यात आलेले आहे. त्याच्या या यशाबददल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.