Home मराठवाडा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या 11व्यापाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या 11व्यापाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

29
0

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

कोरोना चा संसर्ग कोणाला होऊ नये यासाठी प्रशासन वारंवार सूचना देत आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचेच दिसून येत आहे तर काही दुकानदारांनी सर्रास जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवल्याने पोलीस प्रशासनाने अकरा दुकानदारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जालना जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 21 व 22 मार्च रोजी सर्व गर्दी होऊ नये व रोग पसरू नये या उद्देशाने दक्षता घेण्यासाठी आवश्यक सेवा देणारे प्रतिष्ठाने वगळून बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे त्यामुळे अनेक कार्यालयाचा विभागांना सुट्टी असल्याने नागरिक एकत्र येत बैठका रंगवीत असल्याचे दिसून येत आहे

या परिस्थितीत कलम 144 लागू करण्यात आलेली असतांना देखील बदनापूर शहरात मात्र काही दुकानदार आपली दुकाने उघडून गर्दी करीत असल्याचे त्ता तरी बंद करा ना असे सांगण्याची वेऴ प्रशासनवर आली आहे. कोरोना रुग्ण दिवसेंदिवस राज्यात वाढत आहे कोरोणा विषाणूंचा संसर्ग कोणाला होऊ नये यासाठी काटेकोर उपाययोजना केला जात आहे जिल्ह्यासह तालुक्यात कोणालाही या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन वारंवार सूचना देत असून तरी शहरातिल काही लोकाना याचे गांभीर्य नाही. शाळा महाविद्यालय बाजार यात्रा कार्यक्रम बंद आदेश दिले आहेत तर दुसरी प्रशासकीय कार्यालयातही जवळपास बंदीची परिस्थिती आहे काही नागरिक मात्र खबरदारी पाळत नसल्याचे दिसून येत आहे

बदनापूर येथील भाजी मंडई मध्ये मात्र गर्दी होताना दिसून येत आहे लोकांना सुट्टी देण्यात आली असली तरी या सुट्टीच्या काळात घरी राहणे अनिवार्य आहे पण नागरिक सुट्टीमुळे फावला वेळ असल्याने हॉटेल किराणा रसवंतीगृह चौकात अशा ठिकाणी एकत्र येत गप्पांचे फड रगत आहे ,त्यामुळे पोलीस प्रशासनाला कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली व शहरातील दुकानदार इसार बेग रसूल बेग,शेख कलीम चौधरी,शेख सांडू, ,रुपेश रवींद्र गंभीरे,हर्ष कटारिया,प्रसाद उदवंत,शेख नईम,संजय लिंबाजी आठवे,राजू खोलकर,योगेश कोलते,व जावेद कुरेशी विरुद्ध जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

Unlimited Reseller Hosting