May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यावल येथे कोरोणाचा संशयित आढळला

*नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील
यावल शहरात कोरोना चा 28 वर्षीय तरुण संशयित ताब्यात घेण्यात येऊन त्याला यावल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथे सरकारी रुग्णालयात ॲम्बुलन्स ने पाठवण्यात आले सदरचा तरुण हा मुंबई येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे खाजगी ठेकेदाराकडे कामाला मजूर म्हणून कामाला होता तो एक महिन्यापासून शहरात आलेला होता त्याचे लक्षणे तसं दिसत नव्हते नंतर सहा सात दिवसापासून मुंबईला गेल्याने पुन्हा तो परत आला त्याच्यावर संशय बळावल्याने मुंबईहून जळगावला याबाबत कळविण्यात आले व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पोलिसांची संपर्क करून सदरच्या तरुणाला यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाचा शोध घेऊन ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात आणले असता त्याला प्राथमिक उपचार डॉक्टर बीबी बारेला डॉ प्रल्हाद पवार सुर्यकांत पाटील यांच्यासह आदींनी तपासणी केली व जळगांव येथे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणी करता हलविण्यात आले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!