Home मराठवाडा दुबईहुन जालन्यात आलेले ते चार जण रुग्णालयात दाखल ,

दुबईहुन जालन्यात आलेले ते चार जण रुग्णालयात दाखल ,

13
0

सय्यद नजाकत

जालना – प्रतिनिधी -दुबईहून जालन्यात आलेल्या चार नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील रहिवाशी असलेले चार नागरिक गुरुवारी दुबईहून मुंबईमार्गे शुक्रवारी जालना येथे पोहोचले या संबंधिची मिळालेल्या माहितीवरुन पोलीसांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना कळविले आणि त्या चौघांना सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. या चौघांचे स्वॉब तपासणीसाठी पुणे येथे पाठविणार असून शनिवारी सायंकाळ पर्यंत अहवाल आल्यानंतर त्यांना सुटी द्यायची का ते ठरविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले