Home मराठवाडा नायगांव तहसिलदार नांदे मॕडमनी केले नागरिकांना आव्हान

नायगांव तहसिलदार नांदे मॕडमनी केले नागरिकांना आव्हान

183

नांदेड , दि.१८ :- ( राजेश भांगे ) –
कोरोना या आजाराचे प्रसार होवु नये यासाठी खबरदारी चे उपाय म्हणून शहरातील व परिसरातील सर्वच मंगलकार्यालये मधील पुढील कार्यक्रमांवर बंदी घातलेले आहे. व सर्व सरकारी व खाजगी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आले. तसेच परिक्षा रद्द केलेली आहेत. व एक प्रशासक म्हणून सर्वोतोपरि नागरिकांना आव्हान करते कि नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी. तरी देखील आज मी मार्केट मध्ये भेटि दिले असता असे आढळून आले कि नागरिकांना या आजारा बद्दल जराही गांभिर्य नाहि आहे. मी आज नायगांव शहरामध्ये मोठी दुकाने चप्पल असो, कपड्याचे दुकान असो, मोबाईल शाॕपी असो. या हाॕटेल असो,बँका असो या ठिकाणी प्रत्यक्ष भेटि देवुन पाहणी केली तर असे दिसुन आले कि नागरिक मोठया संख्येने गर्दी करत आहेत. रस्त्यावर फिरताना देखील मोठया संख्येने वावरताना दिसुन आले. तर माझे असे कळकळीचे आव्हान आहे कि नागरिकांनी गर्दी न करता स्वतःहुन काळजी घ्यावी. व गर्दी च्या ठिकाणी जावु नये कुठल्याही दुकानात पाच पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करू नये. व विना कारण घराच्या बाहेर निघु नये.

कारण हा आजार अत्यंत गंभीर संसर्गजन्य असे आहे. हा झाल्या नंतर आटोक्यात आणणे प्रशासनासाठी सुध्दा आणि सर्व समाजासाठी कठिण होणार आहे. तसेच ग्रामीण भागात सुध्दा सारपंचांना , तलाठ्यांना , ग्रामसेवकांना सुचना देण्यात आले आहेत गावात मंगलकार्य व ग्रामसभा , बैठाका, सप्ताहा होत असतील तर ते तात्काळ रद्द करावेत. आणि तसेच मंदिर ,मज्जिद अश्या धार्मिक स्थळी देखील नागरिकांनी जाऊन पुजा आर्चा, व नमाजासाठी आपल्या धार्मिक स्थळी न जाता हे सर्व आपल्या घरीच करून गर्दीत येणे टाळावे अशी विनंती केली. तरी यावेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचे एक प्रशासक म्हणून नायगांव तहसिलदार नांदे यांनी पोलिसवाला आॕनलाईन मिडियाच्या मार्फत सर्व नागरिकांना आव्हान केले.