Home महत्वाची बातमी औरंगाबाद ते बदनापूर 35 किलो मीटर ऑनलाईन तक्रार पहोचायला लागले तब्बल 30...

औरंगाबाद ते बदनापूर 35 किलो मीटर ऑनलाईन तक्रार पहोचायला लागले तब्बल 30 दिवस

204

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी बस वाहकविरुद्ध गुन्हा दाखल

जालना/सय्यद नजाकत

शासनाने ऑनलाईन प्रक्रियेस अत्यन्त महत्व देऊन कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न चालविलेला असून गृह खात्याने देखील तक्रारी ऑनलाईन नोंदविण्यास सुरवात केली आहे मात्र 35 किलो मीटर चे अंतर कापण्यासाठी तब्बल एक महिना लागल्याचा प्रकार समोर आला असून एका अल्पवयीन मुलीचा बस वाहकाने विनयभंग केल्याची तक्रार 19 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली असता सदर तक्रार तब्बल 30 दिवसांनी बदनापूर पोलिसांना ऑनलाईन प्रक्रियेत प्राप्त झाली असून आरोपी विरुद्ध मुलीचे विनयभंग केल्या प्रकरणी 18 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मूळ बुलढाणा जिल्ह्यातील व हल्ली मुक्काम औरंगाबाद राहणारी 17 वर्षीय मुलगी 19 फेब्रुवारी 2020 रोजी जालना ते सिडको औरंगाबाद एम एच 14 बी टि 1363 या बसने औरंगाबाद पर्यंत प्रवास करीत होती,सदर बस 7:45 वाजे दरम्यान बदनापूर बस थांब्यावर आली असता बस वाहक शामसुंदर नर्सिंगराव नाईक वय 43 याने बस मधील प्रवाश्यांचे तिकीट काढणे झाल्यानंतर बस मधील लाईट बंद करण्यासाठी डबल घंटी वाजवून चालकास इशारा दिला

बसमधील लाईट बंद झाल्यानंतर वाहकाने अंधाराचा फायदा घेत सदर मुलीच्या अंगावर हाथ लावला असता मुलगी घाबरली व बाजूला सरकून बसली पण पुन्हा वाहकाने मुलीच्या मांडी वर हाथ टाकून विनयभंग केला,सदर प्रकार बदनापूर हद्दीत घडला,मुलगी या प्रकाराने भयभीत झाली व रात्री घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार वडिलांना सांगितला असता फिर्यादी मुलगी व वडील यांनी औरंगाबाद एम आय डी सी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दिली असता पोलिसांनी शून्य गुन्हा नोंदविला व सदर तक्रार दोन दिवसात बदनापूर पोलीस ठाण्यात जाईल असे सांगितले त्यामुळे फिर्यादी व तिचे वडील घरी निघून गेले मात्र दोन चार दिवस उलटले तरी कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा एम आय डी सी पोलीस ठाण्यात चौकशी केली मात्र बदनापूर पोलीस ठाण्यातून तुम्हाला निरोप येईल असे उत्तर देऊन पोलीस मोकळे झाले

सदर घटना घडून जवळपास एक महिना होत आला असून 18 मार्च 2020 रोजी सदर तक्रार बदनापूर पोलिसांना ऑनलाईन प्रक्रियेत प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी शामसुंदर नाईक विरुद्ध कलम 354(अ) भदवी सह कलम 7 व 8 बालकांच्या लैंगिग अपराध पासून शरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल केला असून या मध्ये सदर तक्रार एम आय डी सी पोलीस ठाणे औरंगाबाद येथून शून्य ने दाखल होऊन आज रोजी ऑनलाईन सि सि टी एन एस प्रणाली मध्ये आज प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे नमूद करण्यात आले आहे