Home मराठवाडा आ.राजेश पाडवीचा बोलवता धनी कोण? सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सवाल

आ.राजेश पाडवीचा बोलवता धनी कोण? सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सवाल

174

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी / गंगाखेड – 14 मार्चला एका दैनिकात एक बातमी छापून आली आणि आदिवासींचा राज्याचा नेता व्हायचं भाजपचा आमदाराचं स्वप्न प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याने पूर्ण होत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. धनगर आरक्षण अंमलबजावणी च्या मागणीस असंवेधानीक मागणी असा उल्लेख आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना दिलेल्या पत्रात केल्याचं एका दैनिकात छापून आलंय. या बातमीमुळे धनगर आरक्षण अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली असताना धनगर समाजाच्या युवकांच्या मनात मात्र असंतोष पुन्हा एकदा जागा होऊ पाहतोय. शहादा चे भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्या लेखी पत्राद्वारे उल्लेख केलेली असंविधानिक मागणी खरोखर आमदार पाडवी यांनी लिहिली की त्या तथाकथित पत्रकार आणि त्या पेपरने हे शब्द त्या पाडवीच्या तोंडी घातले याची शहानिशा झाल्यानंतरच खर गुपीत बाहेर येणार आहे. एकूणच आमदार राजेश पांडव यांचा बोलवता धनी कोण आहे हे कळणे महत्वाचे आहे असा सवाल धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केला आहे.
यानिमित्ताने दोन-तीन प्रश्न चर्चेला येत आहेत. राज्यात इतरांची मदत घेऊन का होईना सत्तेवर आलेलं ठाकरे सरकार हे धडाधड निर्णय घेत आहे. ठाकरे सरकाराच्या या निर्णयाने धनगर आरक्षणासाठी वर-वरचा पाठिंबा देणारे आणि छुपा विरोध करणारे दोघेही हादरून गेलेले आहेत. पहिल्याच बैठकीत आरक्षण देतो म्हणून देवेंद्र फडणीस यांनी पाच वर्षे घातले. धनगराच्या शापानेच त्यांना घरी बसावे लागले. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात आले. हे नवे सरकार कर्जमाफी, आंदोलकांना वरील गुन्हे वापस घेणे, नामविस्तार याच्या सारखे निर्णय धडाधड घेत आहे. धनगर समाजाची प्रमुख मागणी असलेला धनगर आरक्षण अंमलबजावणी चा प्रश्न सरकार सोडवतेय कि काय अशी भीती प्रथमता भाजपच्या म्हणजेच फडणीसांच्या मनात निर्माण झालेली आहे. सुदैवाने मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी चा निर्णय घेतल्यास यापुढे मात्र भाजपाला महाराष्ट्रात कायमच सत्तेपासून दूर बसावे लागणार आहे. कदाचित विरोधी पक्षनेतेपद सुद्धा भाजपकडे किंवा फडवनिसाकडे राहील याची खात्री देता येत नाही. धनगर आरक्षणाची अंमलबतावणी शिवसेना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केली जाऊ नये, हि भीती जशी भाजपा नेते, पक्ष आणि फडवणीस बाळगून आहेत तसीच ती आजपर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणापासून दुर ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना पण आहे. पाच वर्ष शरद पवार यांच्या समर्थकांनी तोंडाला फेस येईपर्यंत धनगर आरक्षण अंमलबजावणीची मागणी केली. पण सत्तेवर बसताच धनगर आरक्षण हे लोक विसरून गेले. मुळात आज परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप यापैकी कोणालाच धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाहीये. हे प्रश्न सोडवल्यानंतर आपण सत्तेवर कधीच येऊ शकणार नाही ही भीती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपवाल्यांना आहे. शिवसेना नेते मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे सत्तेच्या राजकारणात नवीन असल्याने यांना धनगर आरक्षण अंमलबजावणी तुन निवडून येणारे आमदारांची भीती कदाचित आज तरी वाटत नसावी .त्यामुळे ठाकरे साहेब कदाचित धनगर आरक्षण अंमलबजावणी चा निर्णय घेतील आणी धनगराचे हिरो होतील ही भीती भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना लागून आहे. त्यामुळेच की काय देवेंद्र फडवणीस यांचा फोटो चोवीस तास खिशात ठेवणारा शहादा जी नंदुरबारचा आमदार राजेश पाडवी याने धनगर आरक्षण अंमलबजावणी च्या मागणी असंवैधानीक मागणी मागणी असा उल्लेख केला. शरद पवारांचे लाभांश असलेल्या एका वृत्तपत्राने बातमी ठळक अक्षरात प्रसिद्धी दिली. एकूणच धनगर आरक्षण अंमलबजावणी होऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. काँग्रेसला धनगर समाजाशी काहीही देणे घेणे नाही. ठाकरे सरकारनेही महिलादिनाच्या निमित्ताने प्रसारित केलेल्या शुभेच्छा पत्रात अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाळून धनगर समाजावरील आपले किती प्रेम आहे हे व्यक्त केले होतेच. शहादाचे भाजपा आमदार राजेश पाडवी यांना अधून-मधून आदिवासी समाजाचा महाराष्ट्राचा नेता व्हायचे स्वप्न पडत आहे. धनगर आरक्षण अंमलबजावणी हा प्रश्न समजून न घेता आमदार राजेश पाडवी यांनी असं पत्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल आहे .पण यातून काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. एखादा आमदार झालेल्या माणसाला धनगर आरक्षण अंमलबजावणी चा अभ्यास नसेल असे कसे म्हणता येईल? त्यांच्या मतदार संघात सुमारे 25,000 धनगर समाज असतानाही या आमदाराच्या अंगात एवढी मस्ती आणि धनगर समाजाला उघड विरोध करण्याची ताकद कशी काय येते? मुळात धनगर आरक्षण अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणावर काहीही फरक पडत नाही व पडणारही नाही. धनगर समाजाने सुद्धा दुसऱ्याचा कोणाचं आरक्षण कमी करून आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी आजपर्यंत कधीही केली नाही आणि यापुढे पण करणार नाही. एवढं असताना राजेश पाडवी यासारख्या आमदाराला अशा उकळ्या कोणती निवडणूक नसताना का फुटत आहेत हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मित्रांनो या विषयावर मांडायचे भरपूर आहे पण तूर्तास एवढेच बहुतांश आदिवासी समाजाचा मोजके दोन-चार नेते वगैरे सोडले तर धनगर आरक्षण अंमलबजावणी कसलाही विरोध नाहीये. एखाद्या जमातीचे आरक्षण द्यायची असेल किंवा त्याची अंमलबजावणी करायची असेल तर दुसर्‍या जमातीस विचारण्याची किंवा त्यांच्याकडून अभिप्राय घेण्याची कसलीही गरज नसते. एवढा असतानाही यानिमित्ताने मी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण अशी बेताल वक्तव्य कराव्या राजेश पाडवी याला निषेध करा. पण एखाद्या समाजातील एका चुकीच्या माणसामुळे पूर्ण समाजास चुकीचे ठरवणे, बदनाम करणे हे आपल्या लोकशाहीला आणी आपल्या संस्कृतीला धरून नाही. एकूणच येत्या विधानसभेत आमदार राजेश पाडवी चा पाडाव करून धनगर समाज शहादा मतदारसंघात भंडारा उधळेल यात तिळमात्र शंका नाही.
एका बाजूस सर्व आंदोलने चालू असतानाच दुसऱ्या बाजूस समाजासाठी अहोरात्र झटणारे महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचचे प्रमुख माननीय मधुजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या न्यायालयास आपले ऐपती प्रमाने आर्थिक योगदान देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.