Home मराठवाडा नमुना नंबर ८ ला उतारा लावुन देण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवक व...

नमुना नंबर ८ ला उतारा लावुन देण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवक व सेवक यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही

149

नांदेड , दि. १७ ; ( राजेश भांगे ) –
बिलोली तालुक्यातील मौ.मुतण्याळ येथील तक्रारदारच्या घरासमोरील प्लॉट ग्रामपंचायतच्या नमुना नं ८च्या रजिस्टरला नोंद करून नमुना नंबरचा उतारा देण्यासाठी मुतण्याळ येथील ग्रामसेवक संभाजी हलदेवाड याने रु.१५ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज १६ मार्च ताब्यात घेतले.
मौ.मुतण्याळ येथील तक्रारदाराच्या घरासमोरील जागा व मोकळी जागा ग्रामपंचायत कार्यालयातील नमुना नंबर ८ च्या रजिस्टरला नोंद करण्यासाठी रु.१५०००/ची लाच मागितली. या बाबत तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवकच्या विरुद्ध दि.१३ मार्चला तक्रार दिली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बिलोली येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून ग्रामसेवक हलदेवाड याने तक्रारदार याच्या नमूद कामासाठी रु.१५०००/ लाचेची रक्कम खतगाव येथील ग्रामपंचायत सेवक तुकाराम वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले.त्यानुसार सदर रक्कम वाघमारे यांनी स्वीकारली त्याचवेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक संभाजी हलदेवाड व तुकाराम वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.