Home मराठवाडा मल्हाराव होळकर यांना जयंतीनिमित्त गंगाखेडात अभिवादन…!

मल्हाराव होळकर यांना जयंतीनिमित्त गंगाखेडात अभिवादन…!

50
0

परभणी / गंगाखेड , दि. १७ :- सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना सोमवारी गंगाखेड येथे अभिवादन करण्यात आले.
शहरातील बसस्थानक परिसरात हा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती माधवराव शेंडगे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पडेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुळशीदास निरस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव यांची उपस्थित होती. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा ऊमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, भाऊसाहेब कुकडे, संतोष टोले, राजेभाऊ गोरे, रासपाचे नेते ब्रिजेश गोरे,जयवंत कुंडगीर, दतराव करवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर साम्राज्य सेनेचे गंगाखेड तालुका उपाध्यक्ष राम भंडारे, महेशभाऊ खवडे, अहिलाजी भुसणर आदींनी परिश्रम घेतले.