Home विदर्भ पथनाट्यातून दिला स्वच्छता जनजागृतीचा संदेश.!

पथनाट्यातून दिला स्वच्छता जनजागृतीचा संदेश.!

126

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १२ :- डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा तसेच नगरपरिषद देवळीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम अंतर्गत जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.कचऱ्यामुळे होणारे आजार माहीत असून सुद्धा नागरिक कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने करत नाही. पथनाट्याच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट सुका कचरा ओला कचरा यांचे विभाजन कचरा कुंडीचा वापर कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या कचऱ्याचे व्यवस्थापन या प्रकारचे संदेश देत पथनाट्य सादर करण्यात आले.
देवळीच्या मुख्य मार्गाने नगरपरिषद कार्यालय बस स्थानक परिसर शिवसेना चौक या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून खा.रामदासजी तडस, मुख्याधिकारी अंकुश जाधव, प्रा. डॉ. प्रवीण वानखेडे इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
कु. शारदा कामडी, अलेशा ठाकरे, आरती लोखंडे, प्रगती राऊत, सुरज दुर्गे, सुरज डहाके, इत्यादी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.