Home सोलापुर बीएसपी अक्कलकोट विधानसभा उमेदवार नागमूर्ती कुरणे यांच्यावर विनयभंगाचा तन्हा दा़खल.

बीएसपी अक्कलकोट विधानसभा उमेदवार नागमूर्ती कुरणे यांच्यावर विनयभंगाचा तन्हा दा़खल.

213

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावांत माणूसकी ला काळिमा फासणारी घटना घडली असुन सतत जीवे ठार मारण्याची धमकी देत सख्या भावानेच बहिणीवर वारंवार बलात्कार केला असल्याची गंभीर घटना घडली आहे.

नागमूर्ती कुरणेअसे या आरोपी भावाचे नाव असून ही घटना खैराट येथे गेल्या सहा वर्षांपासून आजपर्यंत घडली असल्याचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून आरोपी नागमूर्ती कुरणे याच्या विरोधात भा दं वि कलम३७६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नागमूर्ती कुरणे याने आपल्या पेक्षा वयाने मोठी असलेल्या स्वतःच्या बहिणी सोबत 2014 पासून धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले होते. बहीण या गोष्टीस तयार होत नसल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी कुरणे देत असे. बलात्कार चा गुन्हा दाखल झाल्या मुळे संपुर्ण अक्कलकोट तालुका हादरला आहे व अक्कलकोट तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.बहीण भावाच्या नात्याला काळिमा फुसणारी घटना घडल्या मुळे सर्वत्र या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात असून आरोपी ला फासावर लटकवा अशी मागणी महिला करत आहेत.
नागमूर्ती कुरणे हास्वतःला स्वयं घोषित बौद्ध भिक्कु म्हणवून घेतो.बौद्ध भिक्कु चे वस्त्र ही तो अंगावर घालून वावरत असतोअशी ही माहिती त्याच्या गावातुन मिळाली. त्याने अलीकडेच झालेली विधानसभा निवडणुक बीएसपी पक्ष काढून विधानसभा निवडणूक लढवली होती.