Home विदर्भ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे-जिल्हाधिकारी जगामध्ये 93 हजार 90 करोना रुग्ण ,...

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे-जिल्हाधिकारी जगामध्ये 93 हजार 90 करोना रुग्ण , 3 हजार 198 लोकांचा मृत्यु

156

राजेश भांगे

भंडारा :- सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये करोना आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. आज अखेर संपूर्ण जगामध्ये जागतिक आरोगय संघटनेच्या अहवालानुसार एकूण ९३ हजार ९० करोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ हजार १९८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. करोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेची निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादी आहेत. सदर करोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे, शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराने अनुषंगाने ५० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकतांना, खोकतांना नाक व तोंडावर रुमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. अर्धवट शिजविलेले तसेच कच्चे मास खाऊ नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या कार्यक्रमास प्रतिबंध घालावे. करोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने संबंधित आयोजकांनी जिल्हयात गर्दिच्या सार्वजनिक ठिकाणावरील यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदांसारखे गर्दीचे कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयातील स्नेह संमेलने, प्रदर्शने, होळी व इतर धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादी आयोजन केल्यास करोना विषणूचा मोठया प्रमाणावर फैलाव होऊ शकतो.
जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांनी संबंधित आयोजकांस करोना विषाणूच्या आजाराचे गांभिर्य लक्षात आणून देऊन त्यांना गर्दीच्या ठिकाणावरील सर्व काय्रक्रमाचे आयोजन न करण्याबाबत महत्व पटवून दयावे. संबंधित आयोजकांस कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून परावृत्त करावे.