Home विदर्भ बोर्डी येथिल तलाठी खामकर यांनी पकडलेली अवैध रेतिची ट्रालीचे प्रकरण गुलदस्त्यात

बोर्डी येथिल तलाठी खामकर यांनी पकडलेली अवैध रेतिची ट्रालीचे प्रकरण गुलदस्त्यात

111

देवानंद खिरकर – बोर्डी

अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे गेल्या एक महिने पासुन सतत दररोज रात्री घोगानाला मधुन ट्रक्टर धारक हे खुलेआम अवैध रेतीची चोरी करत आहेत.व बोर्डी शिवपुर,रामापुर या तिन्ही गावात 4000 रुपये ट्राली प्रमाने कुठलीही पर्मिशन,किवा कुठलीही रायल्टी नसतांना खुलेआम विक्री करीत आहेत.या बाबत वेळोवेळी बातम्या सुध्दा लावण्यात आल्या होत्या.याचीच दखल घेत बोर्डीचे तलाठी खामकर यांनी दि.9/3/2020 रोजी सायंकाळी 12.30 वाजता दुर्गा माता चौक बोर्डीमधे शिवपुर येथिल मनिष अनिल बोंद्रे यांचा मालकीचा ट्रक्टर क्रमांक एम एच 30 ए एन 255 हा ट्रक्टर रेती खाली करीत असतांना पकडला.व जागेवर पंचनामा सुध्दा केला.व लगेच रेतिचा ट्रक्टर पकडल्या बाबत नायब तहसीलदार गुरव यांना सुध्दा माहिती दिली.नंतर सदर ट्रक्टर हा बोर्डीचे पोलिस पाटील प्रकाश उगले यांच्या ताब्यात देण्यात आला होता.वास्तविक पाहता रेतीचा ट्रक्टर पकडल्या नंतर पंचनामा केल्यावर पोलिस स्टेशनला लावायला पाहिजे होता.परंतू सदर ट्रक्टर हा ट्रक्टर मालक मनिष अनिल बोंद्रे यांचेकडे असल्याचे समजते.गेल्या तिन दिवसापासुन रेतीचा ट्रक्टर पकडल्यावर सुध्दा कारवाई झाली की नाही हे अद्याप समजू शकले नाही.या बाबत सबंधीत तलाठी व नायब तहसीलदार यांना वीच्यारले असता कारवाई करण्यात येईल असे सांगत आहेत.या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून सुरु असलेली रेतीची अवैध वाहतूक थांबविने गरजेचे आहे.कारण शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे.व आज परंत घोगानाला बोर्डी येथून अंदाजे 50 ते 60 ब्रास रेती चोरी गेली आहे याची दखल घेवून घोगा नाल्याची पाहणी करावी.

बोर्डी येथे तलाठी खामकर यांनी रेतिचा ट्रक्टर पकडला आहे.तरी ट्रक्टरवर कारवाई करण्यात येईल.

गुरव नायब तहसीलदार अकोट

दि.9/3/2020 रोजी मी सायंकाळी 12.30 वाजता बोर्डीला अवैध रेती चोरीचा शिवपुर येथिल बोंद्रे यांचा ट्रक्टर पकडला व जागेवरच पंचनामा करुन बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाष उगले यांची सही घेवून त्यांच्या ताब्यात दिला आहे.पुढे काय कारवाई करण्यात आली हे नेमके मला माहीत नाही.