Home मराठवाडा CAA च्या विरोधात ठराव मंजूर केल्याने सेलूचे भाजप नगराध्यक्ष बोराडे पक्षातून निलंबित

CAA च्या विरोधात ठराव मंजूर केल्याने सेलूचे भाजप नगराध्यक्ष बोराडे पक्षातून निलंबित

267

लक्ष्मीकांत राऊत

जालना , सेलू नगरपालिकेचे भाजपा नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ बोराडे यांनी CAA च्या विरोधात नगरपालिकेत ठराव मंजूर केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.


बाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सेलू नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलावली व त्यात CAA च्या विरोधात ठराव मंजूर केला.29 फेब्रुवारी रोजी या ठरावाची प्रत त्यांनी सेलू येथे डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यजवळ CAA च्या विरोधात धरणे देऊन बसलेल्या आंदोलकांना आपल्या हाताने दिली होती. या ठरावावर 27 नगरसेवक पैकी 24 जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या. भाजपा नगराध्यक्ष असतांना बोराडे यांनी दाखवलेल्या धडसाबद्दल परभणी जिल्हाभर चर्चा झाली होती. अखेर या धाडसाचे परिणाम बोराडे यांना भोगावे लागले आणि त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा तुन तडकाफडकी निलंबित केले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरपालिकांनीही अशा प्रकारचा ठराव घेतलेला नसताना बोराडे यांनी हे धाडस का केले याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसात होती. मूळ काँग्रेस चा पिंड असलेल्या बोराडे यांनी काही वर्षा पूर्वी भाजपा प्रवेश केला होता, राज्यातील सरकार भाजपा विरोधात आल्याने त्यांनी स्वगृही परतण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.