Home महत्वाची बातमी नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथील रुग्णांना 24 तास सेवा सुरु राहिल...

नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथील रुग्णांना 24 तास सेवा सुरु राहिल – आमदार सुभाषभाऊ धोटे

439

मनोज गोरे कोरपना

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नारंडा येथील आरोग्य केंद्रात रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णांना 24 तास द्यावी असे आदेश राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

उपसभापती सिंधूताई आस्वले ,वनसडीच्या सरपंच ललिता गेडाम जेष्ठ नेते राजाबाबू गलगट , युवा नेते रोशन आस्वले यांनी दि 27/2/2020ला भेट दिली असता कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णाची गैरसोय होत होती त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी 24 तास सेवा ही उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांना करण्यात आली होती त्या अनुषंगाने आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी तात्काळ दिनांक 29/2/2020 ला प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथे DHO , तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मिटिंग लावून नागरिकांना 24 तास द्या आशा सूचना आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी दिल्या. सदर मिटिंगला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे ,सभापती सौ रुपालीताई तोडासे , उपसभापती सिंधुताई आस्वले , जि . प. सदस्यां विनाताई मालेकार , राजाबाबू गलगट , सुरेश मालेकार,इरफान शेख,प्रदीप मालेकार,मिलिंद ताकसांडे, प्रकाश मोहूर्ले , इत्यादी उपस्थित होते.