
वागदरी – नागप्पा आष्टगी
शिवजयंती निमित्त वागदरी येथील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेेेत कुरनुर येथील मौर्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविला आहे.या स्पर्धेत एकुण ८ संघानी भाग घेतले होते.
.या स्पर्धेचे उध्दघाटन संभाजी सावंत यानी केले .तर प्रतिमा पूजन प्रकाश पोमाजी यांच्या हस्ते झाले.या तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव ,पिंटु गावडे रा स प तालुका उपाध्यक्ष ,वजीर नदाफ ,महादेव सोनकावडे,सुनिल सावंत ग्रा प सदस्य,प्रभु फुटाणे गणेश सिंदे, अमर ठोंबरे .रतन जाधव आदी उपस्थित होते.या स्पर्धेत कुरनुर ,अक्कलकोट व वागदरी येथील कबड्डी संघाने भाग घेतला होता.अंतिम सामना प्रेडस फारेवर वागदरी व मोर्या कबड्डी संघ यांच्यात अटीतटीची सामना झाला.यात कुरनुर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या वेळी राजकुमार जाधव यांच्या हस्ते संभाजी महाराज प्रतिमा देवुन कौरविण्यात आला.
प्रथम बक्षिस ५००१ नागनाथ गोपाळ सावंत यांच्या कडून देण्यात आला. व सिध्दार्थ फौडेंशन यांच्या वतीने चषक व द्वितीय बक्षिस ३००१ काशिनाथ कदम यांच्या कडून व तृतीय बक्षिस २००१ पिंटु गावडे यामच्या कडून देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल सावंत ,बंडू मोरे ,अक्षय सावंत,रोहीत शिंदे,मारूती शिंदे,परमेश्वर सावंत ,सौरव उमरे,गणेश सावंत ,शिवाजी सावंत ,समर्थ सावंत आदी परिश्रम घेतले.पंच म्हणुन विनोद घुगरे, महादेव सोनकावडे ,गोपी सावंत ,वजीर नदाफ यांनी काम पाहिले ,गुण लेखक म्हणुन परमेश्वर बेळ्ळे,नसरूद्दीन मुल्ला ,धनजंय सलगरे,यांनी काम पाहिले.











































