Home यवतमाळ यवतमाळ विधान परिषद प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, केवळ उमेदवार वर नव्हे तर...

यवतमाळ विधान परिषद प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, केवळ उमेदवार वर नव्हे तर शिफारस करणाऱ्यावरही कार्यवाही व्हावी – मोहम्मद आसीम अली

216
filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; niceRunStatus: 2; hdrForward: 0; shaking: 0.039940; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 0; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.0000,0.0000; delta:1; bokeh:1; ispap:1; papproctime: 2026:06:11 13:22:16; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 266.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather:null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;zeissColor: bright;

यवतमाळ – नई परवाज़ मुव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ता मोहम्मद आसीम अली यांनी यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर व अमरावती विधान परिषद निवडणुकीतील घडामोडीविषयी काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लीकाअर्जुन खरगे यांना सविस्तर पत्र व ईमेल पाठवून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमच्या या पत्रामध्ये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लाखो काँगेस कार्यकत्यांची भावना दुखावल्या गेली आहे. हा केवळ एका उमेदवाराचा प्रश्न नसून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या निर्णय प्रक्रिया वर आणि उमेदवार निवडीच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे. काँग्रेस प्रदेश नेतृत्वने केवळ श्री. साहेबराव कांबळे यांच्यावर कार्यवाही करून आपली जबाबदारी संपली असे समजू नये. खरा प्रश्न हा आहे की, त्यांना उमेदवारी कुणी मिळवून दिली ? त्यांची शिफारस कोणी केली ? पक्ष नेतृत्वाकडे त्यांचे नांव कुणी पाठविले? या संपूर्ण प्रक्रिया मागे कोणते नेते आणि पदाधिकारी होते ?

आमची स्पष्ट मागणी आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अश्या सर्व नेत्यांची व पदाधिकाऱ्यांनी नांवे जाहिर करावी. ज्यांचे शिफारसीवरून उमेदवारी देण्यात आली तसेंच चौकशीतील दोषी आढळणाऱ्या सर्व व्यक्तींवर कठोर संघटात्मक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भविष्यात अश्याच घटना पून्हा घडत राहतील आणि त्याचा फटका प्रमाणिक कार्यकर्त्यांना बसत राहील. श्री. राहुल गांधी, देशभर संविधान, सामाजिक न्याय, बेरोजगारी, शेतकरी, युवक आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करीत आहे. अश्या वेळी काही स्वार्थी लोक स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी पक्षाची प्रतिमा मलीन करत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे. आज काँग्रेसचे असंख्य कार्यकर्त्यांचा मनोबल खचलेला आहे. अनेक कार्यकर्ता वर्षानु वर्ष पक्षासाठी संघर्ष करतात. परंतू निर्णय प्रक्रियात त्यांना स्थान मिळत नाही. यामुळे पक्षामध्ये पारदर्शकता, जबाबदारी, उत्तरदायित्व निर्माण करणे काळाची गरज आहे. याच पार्श्व भुमीवर आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व काँग्रेस प्रेमी श्री. राहुल गांधी यांच्या विचारावर विश्वास ठेवणारे युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ता आणि कोणतेही गटाशी संबंधीत नसलेले प्रमाणिक काँग्रेस कार्यकर्ता यांना एकत्रित येण्याचे आव्हान करीत आहोत. हा लढा कोणतेही व्यक्ती विरोधात नसून काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे सन्मान टिकविण्यासाठी आहे.
तसेच पक्षामध्ये अनेक दशकापासून विविध पदावर कार्यरत असलेले वरिष्ठ नेत्यांनी आता मार्गदर्शकाची भुमिका स्विकारून नव्या पीढीला संधी द्यावी. संघटनेची सुत्रे नव्या उर्जावान आणि जनतेशी जुडलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती देण्याची आता वेळ आलेली आहे. अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. मात्र संघटनेत नविन नेतृत्व तयार होणे तितकेच आवश्यक आहे. आम्ही श्री. राहुल गांधी व श्री. मल्लीकाअर्जुन खरगे यांना विनंती करतो की, त्यांनी वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र चौकशी समिती गठित करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कार्यकर्त्यांचे मने जाणून घ्यावी, जबाबदार व्यक्तींवर करावी आणि काँग्रेस पक्षातील प्रमाणिक कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा बहाळ करावा. काँग्रेस वाचवा, कार्यकर्त्यांचा सम्मान करावा, पारदर्शकता आणा आणि जबाबदारी निश्चित करा…!