Home यवतमाळ यवतमाळ शहरातील समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने आयु. “शालिनी घायवान” पुरस्काराने सन्मानित….!

यवतमाळ शहरातील समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने आयु. “शालिनी घायवान” पुरस्काराने सन्मानित….!

254

यवतमाळ – आंबेडकरी समाजात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेहमीच सत्कार होतो परंतु त्या कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी व नैतिक पाठबळ देणारी या कार्यकर्त्याची अर्धांगिनी मात्र नेहमी दुर्लक्षित राहते. तथापि यवतमाळ शहरात मागील 21 वर्षापासून सुरू असलेल्या समता पर्व प्रतिष्ठान, समता मैदान यवतमाळ च्या वतीने अशा महिला कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित मानसन्मान व सत्कार केला.

आयु. शालिनी पद्माकर घायवान यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक व कार्यकर्त्या प्रा. लीलाताई भेले यांच्या हस्ते शालिनी पद्माकर घायवान यांचा सत्कार करण्यात आला.
शालिनी घायवान ह्या गेल्या पंचवीस वर्षापासून समता सैनिक दला करिता कायम योगदान देत राहिल्या. तसेच शालिनी घायवान ह्या यवतमाळ शहरातील सतत आंबेडकरी चळवळीतील रोखठोक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार पद्माकर घायवान यांच्या धर्मपत्नी आहेत.