Home यवतमाळ दहावीच्या निकालात ( CBSE ) चित्रसेन सोनाली नरेंद्र चव्हाण ची उल्लेखनीय कामगिरी

दहावीच्या निकालात ( CBSE ) चित्रसेन सोनाली नरेंद्र चव्हाण ची उल्लेखनीय कामगिरी

181
94.22% गुणांसह शानदार यश संपादन करत उत्तीर्ण

यवतमाळ – काल लागलेल्या Central Board of Secondary एडुकेशन ( CBSE ) अंतर्गत इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालात पोतद्दार इंटरन्याशनल स्कुल यवतमाळ येथील विद्यार्थि चित्रसेन सोनाली नरेंद्र चव्हाण हयाने 94.22% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कळंब तालुक्यातील मार्कडा या गावातील अशी कामगिरी करणारा तो पहिली मुलगा ठरला आहे.
चित्रसेनच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान वाटत आहे. विद्यार्थ्याच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. यामध्ये आई सोनाली चव्हाण व वडील नरेंद्र थावरू चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचेही सांगितले आहे. चित्रसेन आपल्या मेहनतीने आई-वडिलांचे नाव रोशन केले असून त्याच्या या यशामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. शाळेच्या शिक्षकवर्गाने आणि मुख्याध्यापकांनी त्याचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील नागरिकांनीही चित्रसेनच्या घरी भेट देत त्याचा सत्कार केला असून भविष्यात तो आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चित्रसेन याच्या यशामुळे गावातच नव्हे तर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.