
यवतमाळ : महाराष्ट्रातील राजकीय पटलावर आपली पकड अधिक भक्कम करण्यासाठी शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलते राजकीय समीकरण लक्षात घेऊन राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी विविध स्तरांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.














































