Home महत्वाची बातमी बुलडाणा जिल्ह्यातील गॅस टंचाई चा पहिला बळी

बुलडाणा जिल्ह्यातील गॅस टंचाई चा पहिला बळी

404

 

 

रवि अण्णा जाधव

देऊळगाव मही : सध्या घरघुती गॅसचा तुडवडा जाणवत असल्याने स्वयंपाकासाठी अनेकजण इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहे. अशातच इलेक्ट्रिक शेगडीचा शॉक लागून देऊळगाव माहित एका तरुणाचा बळी गेला आहे. गणेश आश्रुबा बनसोडे वय 37 रा. देऊळगाव मही वार्ड क्रमांक (1) असे मृतक तरुणाचे नाव आहे. हे घटना काल दि. 30 मार्च रोजी सोमवारी समोर आली.

सरकार गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा करत आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यात कृत्रिम गॅस टंचाई दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने पर्याने ते इलेक्ट्रिक शेगडीचा व चुलीचा वापर करीत आहेत. काल सायंकाळी मात्र गणेश आश्रूबा बनसोडे कृत्रिम गॅस टंचाईचा बडी ठरला. गणेश आपल्या घरात असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडत असतांना त्याला विजेचा जबर शॉक लागल्याने या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. घरघुती वापरासाठी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर हा घातकचं असल्याने यासाठी आता काळजी घेणे महत्वाचे आहे. गणेश बनसोडे यांच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा आप्त परिवार आहे.