Home अमरावती किरण पातुरकर यांचे स्वयंरोजगर निर्मिती चे कार्य प्रशंसनीय “विभागीय आयुक्त डॉ श्वेता...

किरण पातुरकर यांचे स्वयंरोजगर निर्मिती चे कार्य प्रशंसनीय “विभागीय आयुक्त डॉ श्वेता सिंघल IAS”

277
अमरावती – स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा संचालित स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियाना द्वारे महिलांनी स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टया उभे राहवे म्हणून ईरानी कप धूप बत्ती प्रशिक्षण बंसल कोचिंग सेंटर मध्ये आयोजित केले होते त्या प्रसंगी उदघाटन पर भाषणात, उद्योग फ्रेंडली विभागीय आयुक्त उद्योग डॉ श्वेता सिंघल IAS बोलत होत्या. त्यांनी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान तसेच किरण पातुरकर आणि त्यांच्या टीम चे कौतुक केले, महिलांच्या सक्षमिकरणा साठी ही संस्था प्रत्यक्ष जमिनीवर राहून काम करते यातून महिला आर्थिक दृष्टया सक्षम होतील असेही त्या म्हणाल्या. प्रशासन व व्यक्तिशः त्या स्वतः उद्योजकता विकास अभियान नाला सहकार्य करतील असे त्यांनी जाहिर केले.

धूपबत्ती आणि अगरबत्ती उत्पादन अमरावतीत गृह उद्योग च्या स्वरुपात घरोघरी सुरु करण्याचा स्वयंसिद्ध चा संकल्प असल्याचे किरण पातुरकर यांनी जाहिर केले
महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान मल्टिपरपज फाऊंडेशन व MIDC असोसिएशनचा विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती विभागाच्या उद्योग स्नेही विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पातूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. श्रुती आगलावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. मोनिका उमक, श्री. नेत्रदीप चौधरी (MCED), सौ. उज्वला काळे (पर्यटन अधिकारी) यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात श्री. नितिन पाटमासे यांनी धूपबत्ती निर्मितीचे प्रत्यक्ष मशीनवर प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामुळे उपस्थित महिलांना उद्योगाची सखोल माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रात्यक्षिकाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, कच्चा माल पुरवठा तसेच तयार माल खरेदीची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे महिलांना उद्योग उभारणीसाठी संपूर्ण मदत मिळणार आहे.
महिलांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन आयोजक किरण पातूरकर व प्रा. डॉ. मोनिका उमक यांनी यावेळी केले.
हा कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांची अधिक गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन प्रा मोनिका उमक तसेच आभार प्रदर्शन कीर्ती देशमुख यांनी केले. यावेळी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या उद्योजिका जयश्री गुंबळे स्मिता,घाटोळ मंगला चांदुरकर, रश्मी इंदूरकर प्रतिभाताई तायडे, तसेच बंसल क्लासेसच्या संयोजिका श्रुती आगलावी उपस्थित होत्या
या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर पाचही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या