Home यवतमाळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारा मुज्जमील (मुज्जू) पटेल ठरतोय देवदूत…..!

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारा मुज्जमील (मुज्जू) पटेल ठरतोय देवदूत…..!

322
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)  – एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून मुज्जमील (मुज्जू) पटेल यांची अशी ओळख निर्माण झाली आहे.
आता पर्यंत त्यांनी बहुसंख्य अपघातग्रस्ताना आपल्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने जीवनदान दिल्याने मदतीसाठी धावून येणारा “देवदूत”अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे.
बेलोरा (ता.घाटंजी)या छोट्याश्या गावातील मुज्जमील (मुज्जू) पटेल उपसरपंच असून भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो, “सेवाभाव परमो धर्म ” या युक्तीनुसार अडीअडचणीत किंवा अपघातग्रस्ताना मदतीचा हात द्यावा, मानवी जिवनच हे धर्म या दृष्टीकोनातून मुज्जमील (मुज्जू)पटेल अनेक वर्षांपासून घाटंजी तालुक्यात कोणत्याही गावांमध्ये अपघात झाल्याचे कळताच मुज्जू पटेल हे आपल्या हातातील काम सोडून त्या अपघातग्रस्तांच्या मदतसाठी जातात. आतापर्यंत मुज्जमील (मुज्जू) पटेल यांनी अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे बहुसंख्य अपघात ग्रस्तानां जीवनदान मिळाल्याने त्यांच्यासाठी ते देवदूतच ठरले आहेत.
*स्वखर्चाने रुग्णांवार उपचार*
घाटंजीसह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात किंवा कोणतीही घटना घडल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न करता मुज्जू पटेल हे त्यांच्या मदतीसाठी धावून स्वतः वाहन चालवीत नेऊन त्याला उपचारासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दाखल करतात. अनेकदा काही काही रुग्णांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात देखील दाखल केले असून रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती बेताची असल्यास त्यांनी मित्र मंडळीच्या मदतीने रुग्णांना काही अंशी खर्चदेखील केलेला आहे.
पूर्वी अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जायची, परंतु नागरिकांनी आपल्या मनातील ही भिती दूर करून अपघातग्रस्तांचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला तात्काळ रुग्णालयात पोचविण्याचे प्रयत्न करावेत. त्यावेळी जातीधर्माचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाळावा.
– *मुज्जमील (मुज्जू) पटेल*