Home यवतमाळ लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार..

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार..

966
पारवा पो. स्टे. हद्दीतील घटना 
———————————–.
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)  – तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वगारा (टाकळी) येथिल विवाहित असलेला आरोपी सहबाज मतीन शेख वय ३० वर्षे याने एका गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
वगारा(टाकळी) येथिल सहबाज शेख याने एका गावातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्या प्रकरणी पीडिता कडून दिनांक १८ मार्च बुधवारला पारवा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली त्यावरून अपराध क्रमांक १५८/२०२६ कलम ६९ कलम बि.एन.एस.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास जारी केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड व पारवा पोलीस करीत आहे. वृत्त लिहेपर्यंत आरोपीस अटक झालेली नव्हती.