Home यवतमाळ उमरखेड वेअर हाऊस ग्रेडरची प्रत्येक गाडी अडीच हजार रुपयांची मागणी.

उमरखेड वेअर हाऊस ग्रेडरची प्रत्येक गाडी अडीच हजार रुपयांची मागणी.

280
तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्र चालक त्रस्त
उमरखेड:- रितेश पाटील
नाफेड खरेदी केंद्रावरील हरभरा व तुर वेअर हाऊस वर साठवण्यासाठी जात असताना त्याठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रेडर कडून विविध कारणे देत प्रत्येक गाडीला अडीच हजार रुपयांची मागणी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेतकऱ्यांच्या तुर,हरभरा पिकांची हमीभावने खरेदी करण्यासाठी उमरखेड तालुक्यात खाजगी खरेदी केंद्रांना नाफेड कडून परवानगी देण्यात आली.त्यानुसार याठिकाणी माल खरेदी करून तो माल उमरखेड येथील वखार महामंडळाच्या वेअर हाऊस वर साठवणुकीकरिता पाठविला जात आहे.
परंतु येथील बाल्टिक कंट्रोल कंपनीचा अमोल धुमाळ नामक ग्रेडर विविध निकषांच्या नावावर या खरेदी केंद्रावरील माल उतरविण्यास नकार देत असुन जर तुमची गाडी खाली करावयाची असेल तर प्रत्येक गाडी मागे अडीच हजार रुपये देण्याची मागणी करीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बुधवार (दि.१८मार्च) रोजी तालुक्यातील पोफाळी येथील साई आधार फार्मा प्रोडूसर कंपनीच्या खरेदी केंद्रावरील माल घेऊन उमरखेड येथील शासकीय वेअर हाऊस वर गाडी गेली असता त्यांना त्याठिकाणी विविध निकषांच्या नावावर माल घेण्यास नकार दिला गेला.त्यानंतर त्याठिकाणी कार्यरत असलेल्या अमोल धुमाळ या ग्रेडरने साई आधारचे संचालक संदीप दळवे यांना थेट संपर्क करून तुमची गाडी खाली करावयाची असेल तर आम्हाला प्रत्येक गाडीला अडीच हजार रूपये खर्च पाण्यासाठी द्यावे लागेल असे सांगितले.अगोदरच अनेक निकषांची पूर्तता करून माल खरेदी केल्यावर अजुन कोणते निकष बाकी आहेत असा प्रश्न दळवे यांना पडला त्यामुळे त्यांनी याबाबत कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले असल्याची माहिती असुन दळवे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी यवतमाळ, नाफेडच्या वरिष्ठांकडे तक्रार करून या ग्रेडर व त्याला पाठीशी घालणाऱ्या बाल्टिक कंट्रोल कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
###चौकट####
अवैध वसुलीला गोविंद व व्यंकटेशचे पाठबळ?
उमरखेड येथील शासकीय वेअर हाऊसवर सोयाबीन खरेदीमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला होता.तेव्हा माध्यमांनी या प्रकाराबद्दल आवाज उठविल्या नंतर याठिकाणी कार्यरत ग्रेडरची उचल बांगडी करण्यात आली.परंतु आता मात्र बाल्टिक कंपनीच्या गोविंद शिंदे व कंपनीत कोणत्याच पदावर कार्यरत नसलेल्या व्यंकटेश गबाळे यांनी कंपनीच्या वरिष्ठांशी मिलीभगत करून थेट माजलगाव वरून आपल्याला पुरक असा अमोल नामक ग्रेडर याठिकाणी पाठवुन त्यांच्यामार्फत नाफेडच्या खरेदी केंद्र चालकाकडून वसुली करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याची माहिती असुन अमोल,गोविंद व व्यंकटेश यांच्या कॉल डिटेल्स, फोन पे,बँक अकाउंट यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे.