
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पारवा येथिल लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठया उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना रुपेश आरेवार, गिरीश सुकंडवार, शिक्षिका स्वाती आरेवार व पालक विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका यांनी शाळेचा वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि ईतर विविध स्पर्धामध्ये भाषणात विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्व पटवून दिले. त्यांनी विध्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. यामध्ये सिया ओमप्रकाश उदार हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवारंच्या हस्ते प्रदान करीत तिच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
. या समारंभामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा सर्वासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.












































