Home यवतमाळ सायफळ पैनगंगा नदीपात्रातून रेती तस्करी चा कहर

सायफळ पैनगंगा नदीपात्रातून रेती तस्करी चा कहर

388
महसूल पोलीस वनविभागाचे दुर्लक्ष

घाटंजी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या कुर्ली महसूल मंडळातील सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांनी अक्षरषा धुमाकूळ घातला असून दररोज शेकडो ब्रास रेतीची विना परवाना उत्खनन करून सायफळ गावाला लागून असलेल्या किनवट तालुक्यातील २० ते २५ गावात रात्रंदिवस खुलेआम रेतीची वाहतूक केली जात आहे या बाबत घाटंजी तहसिलदार व सायफळ येथे कार्यरत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना माहीती देवूनही कारवाई साठी अद्यापही सायफळ येथिल रेती घाटाकडे फिरकले नसल्याने रेती तस्करांना महसूल पोलीस वनविभागाचे मुकसंमती तर नाही ना अशी चर्चा नागरीकामध्ये रंगत आहे घाटंजी येथे विद्यमान तहसिलदार यांनी पदभार स्विकारताच रेती तस्करावर अंकूश लावले मात्र गत एक महीन्यापासून रेती तस्करावरील कारवाई थंडावल्याने घाटंजी तालुक्यातील लिलाव न झालेल्या सायफळ घाटावरून बेसुमार रेतीचा अैवध उपसा सुरु असून याबत सायफळ येथिल काही सामाजिक कार्यकर्ते यांनी महसूल पोलीस वनविभाग यांना रेती तस्करी सुरू असल्याबाबत माहीती दिली मात्र संबधीत विभागाकडून कारवाई चे पाऊल उचलले असल्याचे दिसत नाही दररोज शेकडो ब्रास रेतीची तस्करी होत असतांना कारवाई का नाही असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहे सायफळ रेतीघाटाकडे महसूल पोलीस वनविभागाचे पथक फिरकत नसल्याने रेती तस्करांची हिम्मत दिवसेदिवस वाढत चालली आहे यामुळे दिवसा ढवळ्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत आहे सायफळ घाटाकडे फिरकून कारवाई करतील का हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.