Home यवतमाळ एआय तंत्रज्ञानाद्वारे माती परीक्षणासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांना दिल्लीत निवेदन.

एआय तंत्रज्ञानाद्वारे माती परीक्षणासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांना दिल्लीत निवेदन.

246
श्रीमती पुष्पाताई ग्रामीण विकास बहु. संस्थेचा पुढाकार.

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या मातीची सुपीकता तपासणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे या उद्देशाने श्रीमती पुष्पाताई ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या वतीने केंद्रीय कृषी ना. शिवराजसिंह चौहान व शेतकरी कल्याण मंत्री, भारत सरकार यांना एआय (Artificial Intelligence)  आय आय टी कानपूर,आधारित “विशेष माती परीक्षण” प्रकल्पासाठी CSR निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.

 आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा हा शेतीप्रधान असून मातीची घटती सुपीकता, अयोग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर माती परीक्षणाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने आधुनिक AI आणि ML आधारित “भू-परीक्षक” तंत्रज्ञानाचा वापर करून जलद, अचूक आणि तात्काळमाती परीक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काही मिनिटांत माती परीक्षण अहवाल उपलब्ध होईल, योग्य खत शिफारसी मिळतील, उत्पादन खर्चात बचत होईल तसेच पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. यामुळे शाश्वत शेती, माती संवर्धन आणि कार्बन क्रेडिटसारख्या उपक्रमांनाही चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात AI आधारित माती परीक्षणामुळे ,हजारो शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यासाठी CSR निधीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी संस्थेने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या CSR निधीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न ३०टक्के वाढेलल,रासायनिक खतावरिल खर्च ६० टक्के कमी करण्यास मदत होईल,मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास संस्थेचे सचिव हरिविजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.