Home यवतमाळ जागतिक महिला दिवस स्त्रीशक्तीचा गौरव करतो – सरपंचा संगीताताई मडावी

जागतिक महिला दिवस स्त्रीशक्तीचा गौरव करतो – सरपंचा संगीताताई मडावी

346

पारवा जि.प. कन्या शाळेत जागतिक महिला दिन साजरा..
————————————–
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
पंचायत समिती अंतर्गत मधिल पारवा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेच्या विध्यार्थिनी व माता पालकांच्या वेशभूषा व विविध कृतीतून महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारवा ग्रामपंचायतच्या सरपंचा संगीताताई मडावी व उदघाटक म्हणून शाळा व्य. समितीच्या उपाध्यक्षा उषाताई चौधरी हया होत्या तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पारवा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी रंजना मसराम, आरोग्य विभागाच्या एस. टी. घोडाम निमा इंदूरकर हया लाभल्या होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी महिला दिवस स्त्रिशक्तीचा गौरव करतो आणि त्यांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरित करतो असे प्रतिपादन सरपंचा संगीताई मडावी यांनी केले. व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय महिला पोलीस कर्मचारी रंजना मसराम यांनी महिला सक्षमीकरण व महिलांच्या सुरक्षिततेबाबत व महिलांचे अधिकार कर्तव्य, पोलीस प्रशासनाची मदत याविषयी विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. सोबतच आरोग्य विभागाकडून महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याविषयी माहिती देण्यात आली तर वनविभागाकडून पर्यावरण संवर्धन याविषयी मार्गदर्शन मिळाले.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात शाळेच्या विध्यार्थिनी मनस्वी बिरकुरवार-सैनिक, अर्णवी आरेवार – डॉक्टर, अर्पिता कुत्तरमारे – अभियंता,सना सय्यद – वैमानिक, आलिया शेख -शिक्षिका, अनुश्री बल्लूरवार – माता रमाबाई,मानसी इसपाडे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अमृता बोगावार – वैज्ञानिक, निकिता तोडसाम – महिला शेतकरी, यांचे पात्र धारण करून त्या त्या वेशभूषेत उत्तम प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित महिलांनी आपले अनुभव मांडत महिला सशक्तीकरणासाठी शिक्षण व आत्मविश्वासाचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला माता पालक व महिलांनी बहुसंख्य उपस्थिती दर्शवली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शालेय पोषण आहाराच्या मदतनीस ताईने अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत भेदूरकर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका कु.गीता मानकर यांनी मानून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.