Home यवतमाळ Online RTI Portal वरून प्राप्त माहिती अधिकार अर्जांवर विहित कालावधीत निर्णय दिला...

Online RTI Portal वरून प्राप्त माहिती अधिकार अर्जांवर विहित कालावधीत निर्णय दिला जात नसल्याबाबत अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी सादर केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय ( माहिती अधिकार विभाग ), यवतमाळ यांनी सर्व भारस्थ अधिकारी व सर्व कार्यालयांना स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.

677

यवतमाळ – जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकार विभागाकडून Shilpa Bharat Nagarale यांनी डिजिटल स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेशानुसार, Online RTI Portal वर प्राप्त झालेल्या अर्जांवर माहिती अधिकार अधिनियम, 2005 मध्ये नमूद केलेल्या कालमर्यादेत निर्णय देणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. संबंधित अर्ज प्रलंबित ठेवणे अथवा निर्णय देण्यात विलंब करणे हे कायद्याच्या तरतुदींना बाधक ठरू शकते, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सदर आदेशामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकांचा संदर्भ देत, सर्व कार्यालयांनी प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी प्रशासनाने ऑनलाईन प्रणाली प्रभावीपणे राबवून पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशी मागणी केली आहे. या आदेशामुळे RTI अर्जांच्या निकाली काढण्याच्या प्रक्रियेत गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.