Home महत्वाची बातमी न्यायालयाने केले राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीचे लवाद वसुली प्रकरण खारीज

न्यायालयाने केले राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीचे लवाद वसुली प्रकरण खारीज

884

जिल्हा न्यायालयाने अवार्ड रद्द केल्याचे कारणाने वसुलीचे प्रकरण केले खारीज

यवतमाळ – राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीचे वतीने अमर शिंदे व इतर यांचे विरोधात दाखल केलेले लवाद वसुली प्रकरण विद्यमान दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) यवतमाळ यांनी विद्यमान प्रमुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय, यवतमाळ यांचे न्यायालयाने दिनांक १० फेब्रुवारी रोजी विवादित एकतर्फी अवार्ड रद्द केल्याचे कारणाने खारीज केले.

शहरातील अमर शिंदे यांचेविरोधात मे राजलक्ष्मी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटी लिमिटेड यवतमाळ यांनी लवाद अधिकारी यांचे समक्ष प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणाची संपूर्ण सुनावणी हि कोविडचे काळात पार पडली होती. राजलक्ष्मी चे वतीने विद्यमान दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) यवतमाळ यांचे न्यायालयात लवाद वसुलीचे प्रकरण दाखल केल्यानंतर त्याचा समन्स मिळाला असता, अमर शिंदे यांना आपले विरोधात एकतर्फी विवादित अवार्ड पारीत झाल्याची व त्याची वसुली होणेकामी लवाद वसुली प्रकरण दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाली. सबब अमर शिंदे यांनी लवाद अधिकारी यांनी पारीत केलेल्या एकतर्फी अवार्डचे विरोधात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय, यवतमाळ यांचे न्यायालयात दाद मागितली होती. सदर प्रकरणी अमर शिंदे व राजलक्ष्मी यांची दोघांचीही बाजू ऐकून घेत दिनांक २५/०९/२०२५ रोजी सदरचा विवादित अवार्ड रद्द केला होता व लवाद अधिकारी यांना नव्याने सुनावणी घेण्याकरीता आदेशित केले होते.

विवादित अवार्ड रद्द झाल्यानंतर अमर शिंदे यांनी सदरची बाब विद्यमान दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) यवतमाळ यांचे समक्ष अर्ज दाखल करून निदर्शनास आणून दिली असता, न्यायालयाने राजलक्ष्मी चे वतीने अमर शिंदे यांचे विरोधात दाखल केलेले लवाद वसुली प्रकरण दिनांक १० फेब्रुवारी रोजी खारीज केलेले आहे. याप्रकरणी अमर शिंदे यांचेवतीने न्यायालयात ॲड. निखील सायरे, ॲड. रंजित अगमे यांनी बाजू मांडली. त्यांना याकामी ॲड. भावेश श्रीराव व ॲड. रवी कुकडे यांचे सहकार्य लाभले.