Home यवतमाळ यवतमाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी साजरी

यवतमाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी साजरी

226

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

यवतमाळ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यवतमाळ शहर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने दाते कॉलेज चौक येथे आज गुरुवारी भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात युवासेना जिल्हाप्रमुख प्रद्युम्न जवळेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
युवासेनेच्या वतीने प्रद्युम्न जवळेकर यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘चालू घडामोडी’ विषयाच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. यानंतर दाते कॉलेज परिसरात अन्नदानाचेही आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हा समन्वयक संजय हातगावकर, सुरेश चिंचोळकर (पश्चिम विदर्भ समन्वयक, आदिवासी विभाग) आणि संजय रंगे यांची उपस्थिती होती.
तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख दर्शना इंगोले, युवासेना लोकसभा प्रमुख विशाल गणात्रा, शहरप्रमुख निलेश बेलोकार, महिला शहरप्रमुख सरला इंगळे, महेश पवार, फिरोज पठाण, अजय खोंड, बाळासाहेब शिंदे, प्रवीण निमोदिया, ज्योती चिखलकर, सौरभ तिवारी, संजय उपगंनलावार, पद्माकर काळे, रमेश अग्रवाल, राहुल गंभीरे आणि राजू चांदेकर उपस्थित होते.

कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक चैताली बेलोकार, लोकेश इंगोले, पिंटू बांगर, सपना उपगनलावार, आकाश परतेकी, पूजा गायकी, शोभा साबळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल कांबळे यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मानले.