Home यवतमाळ बाल विवाह मुक्त यवतमाळ चा नारा देत ‘चाचा नेहरू बाल महोत्सव २०२५-२६’...

बाल विवाह मुक्त यवतमाळ चा नारा देत ‘चाचा नेहरू बाल महोत्सव २०२५-२६’ उत्साहात संपन्न

180

यवतमाळ – महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सव २०२५-२६’ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

‘बाल विवाह मुक्त यवतमाळ’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या महोत्सवात जिल्ह्यातील मुलांनी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचा तपशील: दिनांक १९ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान चाललेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मा श्री दाभाडे सचिव विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मा. श्रीमती मंगला मुन, यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पारितोषिक वितरण समारंभात (२० जानेवारी) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. शेखर मुनघाटे, प्रमुख न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळ श्रीमती शर्वरी जोशी यांनी विजेत्या बालकांचा गौरव केला. यावेळी मान्यवरांनी मुलांमधील सुप्त गुणांचे कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या तीन दिवसांत विविध खेळांचे सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामाध्यमातून बालहक्क आणि बालसंरक्षण याविषयी जनजागृती करण्यात आली.
आयोजकांचे मनोगत: कार्यक्रमाचे आयोजक आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. श्री. विशाल जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व उपस्थितांचे, सहभागी मुलांचे आणि अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले.
यावेळी बाल न्याय मंडळ श्रीमती काजल कावरे, श्री राजू भगत आणि बालकल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे सदस्य श्रीमती लीना आदे, श्री अनिल गायकवाड , महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाल महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी तथा कर्मचारी वृंद, तसेच या कार्यालय अंतर्गत असलेले सर्व संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन, बालगृहाचे सर्व अधीक्षक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.