Home यवतमाळ पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे विशेष पोलीस महानिरक्षिक श्री. रामनाथ पोकळे यांच्या...

पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे विशेष पोलीस महानिरक्षिक श्री. रामनाथ पोकळे यांच्या हस्ते नागरीकांचे हरवीलेले एकुण १२ मोबाईल केले परत

436

यवतमाळ – पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता यांच्या संकल्पनेतुन पोलीस व जनता यांच्यात संबंध वृददीगंत करण्याकरीता पोलीस समन्वय हि संकल्पना राबविण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मोबाईल वाटप आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्या बाबत तक्रार दिलेल्या होत्या तक्रारदार यांचे मोबाईलचा शोध CEIR पोर्टलचा पोलीस स्टेशन यवतमाळ शहर स्तरावर वापर करुन शोध घेण्यात आला त्यामध्ये एकुण १२ मोबाईल किंमत अंदाजे १,३७०००/- रुपयांचा मुददेमाल तक्रारदार यांना आज दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब परिक्षेत्र अमरावती यांची आज पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे सप्राईज व्हिजीट असल्याने त्यांच्या हस्ते अंध इसम नामे संतोष तुकाराम सोयाम यांचा हरविलेला मोबाईल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब परिक्षेत्र अमरावती यांच्या हस्ते तसेच इतर नागरीकांचे मोबाईल परत करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात सा, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे सा यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पोलीस अंमलदार रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर यांनी पार पाडली आहे .