Home यवतमाळ उत्तम रोजगारासाठी फार्मासुटीकल इंस्टुमेंट हाताळणी कौशल्य अत्यावश्यक- श्री.किरण बनकर यांचे प्रतिपादन

उत्तम रोजगारासाठी फार्मासुटीकल इंस्टुमेंट हाताळणी कौशल्य अत्यावश्यक- श्री.किरण बनकर यांचे प्रतिपादन

296

पी वाधवाणी फार्मसी महाविद्यालयात इंन्स्ट्रमेंट हॅन्डलींगवर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 यवतमाळ – पी वाधवाणी फार्मसी महाविद्यालय मोहा फाटा, यवतमाळ येथे दिनांक 19 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान महाविद्यालयाच्या श्रोतगृहामध्ये इंस्टुमेंट हॅडलींग, कॅलीब्रेशन आणि ऑपरेटिंग प्रोसीजर्स आॅफ साॅफेस्टीकेटेड इंस्टुमेंट यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, एम फार्म व बी फार्म विद्याथ्र्यानी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला. दिनांक 19/01/2026 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान उद्घाटनीय सोहळा मोठया दिमाखात पार पाडला. कार्यशाळेची सुरवात माता सरस्वती प्रतिमेच्या पुजनाने झाली. उद्घाटन सोहळयात प्राचार्य डाॅ अनिल चांदेवार व प्रमुख वक्ते श्री.किरण बनकर, विभाग प्रमुख, गुणवत्ता नियंत्रण विभाग, इप्का लॅब, मुंबई हे उपस्थीत होते. प्राचार्य डाॅ.अनिल चांदेवार यांच्या हस्ते लालफीत कापुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यशाळेची रूपरेखा प्रा डाॅ शिल्पा गावंडे यांनी सादर केली. प्राचार्य डाॅ अनिल चांदेवार यांनी फार्मसी क्षेत्रामध्ये विविध अदयावत उपकरणे वापरण्यात येतात व या उपकरणांचा अभ्यास आणि वापर महत्वपूर्ण आहे असे यांनी सांगितले

प्रथम सत्रात श्री किरण बनकर यांनी फार्मसी क्षेत्रामधे वापरण्यात येणा-या विविध उपकरणे व त्यांची संरचना यावर माहीती दीली. व्दितीय सत्रात श्री.किरण बनकर, यांनी यु व्ही स्पेक्ट्रृोफोटो मीटर, एच.पी एल सी, पी एच मीटर, एफ टी.आय आर या अत्यंत नावीण्यपूर्ण उपकरणांवर प्रकाश टाकला त्यानी उपकरणांचे विविध विभाग व त्यांचे कार्य समजावून सांगीतले तसेच त्यानी उपकरणांचे कॅलीब्रेशन, वापर व दुरूस्ती वर मार्गदर्शन केले

दिनांक 20/01/2026 रोजी प्रथम सत्रात श्री किरण बनकर यांनी वेयींग बॅलेंस, फ्रायबॅलीटी टेस्ट इंस्टुमेंट, स्प्रे ड्रृायर या उपकरणावर मार्गदर्शन केले त्यानी उपकरणांचे विविध विभाग व त्यांचे कार्य समजावून सांगीतले तसेच त्यानी उपकरनाचे कॅलीब्रेशन, वापर व दुरूस्ती वर मार्गदर्शन केले व्दितीय सत्रात त्यांनी कार्ल फीशर, डिझोल्युशन उपकरण, डिसइंटीग्रेशन उपकरण यावर महत्वपुर्ण माहिती दिली.

समारोपीय संमारंभास डाॅ मनिषा किटुकले, प्राचार्य, पी वाधवाणी फार्मसी महाविद्यालय, गिरीजा नगर यवतमाळ हया अध्यक्ष म्हणुन लाभल्या तर प्रमुख अतिथी प्राचार्य डाॅ अनिल चांदेवार व श्री किरण बनकर हे मंचावर उपस्थित होते कार्यशाळेतील सहभागी प्रतिनिधी यांनी यथोचीत विचार प्रगट करून ही कार्यशाळा यशस्वी झाली असे प्रतीपादन केले आभार प्रदर्शन कार्यशाळा समन्वयक डाॅ माधुरी चन्नावार यांनी केले.

या कार्यशाळेकरीता प्राचार्य डाॅ अनिल चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा समन्वयक डाॅ शिल्पा गावंडे, प्रा. डाॅ माधुरी चन्नावार, डाॅ भारती बाकडे, डाॅ दिपक मोहाळे, प्रा तुषार रोडे व प्रा ईश्वरी चैधरी यांनी काम पाहीले.