Home विदर्भ विटाळा देवगांव मार्गावर संचालीत सर्व बार द्वारे सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे उल्लंघन

विटाळा देवगांव मार्गावर संचालीत सर्व बार द्वारे सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे उल्लंघन

107

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

बाबाराव इंगोले – झाडगांव

अमरावती / धामणगांव रेल्वे , दि. ११ :- तालुक्यातील विटाळा-देवगांव रोडवर आठ ते नऊ वाईन बार असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य मार्गा पासून दारुचे दुकान मध्ये २२० मीटरचे अंतर आवश्यक आहे.विटाळा ते बोरगांव धांदे रोड हे राज्य मार्ग असून मागील काही दिवसापूर्वी येथील संपुर्ण बार व दारुचे दुकाने बंद पडली होती.पंरतू सूप्रीम कोर्टाच्या आदेशाला मार्ग काढून राज्य उत्पादन शूल्क विभागाकडून २२० मीटरचा निर्देश पालन करुन नागमोडी पध्दतीचा वापर करुन तळजोडीने पुन्हा रस्त्याचे बार सूरु करण्यात आले.पंरतू असे निदर्शेनात येत आहे की,राज्य उत्पादन शूल्क विभाग अमरावतीच्या मेहरबाणीने संपुर्ण बार सूप्रीम कोर्टाच्या २२० मीटर अंतराचा सर्रास उल्लंघन करीत असून शार्टकट मार्गाचा फार्मूला पालन करीत आहे.परंतू राज्य उत्पादन शूल्क विभागाची पुरेपूर मेहरबाणी बारवर असल्याच्या चर्चेला धामणगांव रेल्वे तालूक्यात उधाण आलं आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धूऱ्यावर ठेवल्या जात असतांना कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य उत्पादन विभागाला जाग येईल का?विश्वस्त सूञाकडून माहीत झाले की,सदर प्रमुख राज्य मार्ग बदल काही बार मालक हायकोर्टात गेला असून राज्य मार्ग बदल सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाब मागण्यात आला आहे.पुर्वीला हेच बार मालक सदर विभागात माहीती विचारली असता विभागाद्वारे सदर प्रमुख मार्ग राज्य दर्जाचा आहे;अशी माहीती संबंधीत अधिकाऱ्यांच्या अतंर्गत जानकारी देण्यात आली.तसेच आता केसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग काय उत्तर देतील हे विचारणीय आहे.राज्य उत्पादन शूल्क विभाग बार मालकाद्वारे सुप्रिम कोर्टाचे २२०मीटरचे अंतरचे आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची नोंद घ्यावी अन्यथा कडक कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधीत विभाग काय कार्यवाही करणार याकडे परीसरातील सुज्ञ जनतेचे लक्ष लागले आहे.