शरीफ शेख
रावेर , दि. ११ :- रेल्वे स्टेशन परिसरात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष राजूभाऊ सवर्णे, सरचिटणीस उमेशभाऊ गाढे, प्रवक्ते नगीनदास इंगळे सर, दीपक तायडे सर, उपाध्यक्ष संघरक्षक तायडे, चंद्रकांत गाढे, पंकज वाघ, सचिव महेशभाऊ तायडे, सचिव संतोष कोसोदे, रावेर शहर अध्यक्ष पिंटूभाऊ वाघ, शहर उपाध्यक्ष सुनील शिरतुरे, प्रदीप तायडे, अविनाश इंगळे, सिद्धार्थ शिरतुरे, कार्यालयीन सचिव सदाशिव निकम, राहुल डी. गाढे, धनराज घेटे, उपस्थित होते.
तसेच शाखेच्या अध्यक्षपदी रवींद्र तायडे तर उपाध्यक्ष पदी रवी चावरे यांची निवड करण्यात आली. सचिव दीपक तायडे, कार्याध्यक्ष राजू तायडे, नितीन तायडे, रत्नाकर बनसोडे, प्रणय टाकते, निलेश नन्नावरे, किरण भालेराव, गोपाळ खैरे, विशाल तायडे, किरण तायडे, चंद्रभान भालेराव, गौतम भालेराव, रवींद्र उइके, महेंद्र मोरे, कृष्णा बिरपन, मयूर मोरे, किरण पवार, गोपाळ पवार, जयेश मोरे, अभिषेक मोरे, यश मोरे यांनी कार्यकारणी गठीत करण्यात आली.