Home यवतमाळ यवतमाळ ट्रॅफिक पोलिसांनी वाचविले बस मधील प्रवाशाचे प्राण.

यवतमाळ ट्रॅफिक पोलिसांनी वाचविले बस मधील प्रवाशाचे प्राण.

1227
यवतमाळ – जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ येथे नेमणुकीस असलेले पो. हवा. निलेश झाडे ब.नं. 938 यांनी दि. 01/01/2026 रोजी 6: 20 वाजता स्टेट बँक चौक ( SBI ) यवतमाळ येथे कर्तव्यावर हजर असताना धामणगाव ते यवतमाळ येणाऱ्या एसटी बस मधील कंडक्टर यांनी सांगितले की, बस मधील प्रवासी नामें रोषन गणेश बुटके, वय 25 वर्ष, राहणार कवठा रेल्वे, ता.पुलगाव, जि. वर्धा, यांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांना मदत करा, तेंव्हा ड्यूटी वरील पो. हवा. यांनी क्षणाचीही विलंब न करता बस मधील प्रवासी नामें रोषन गणेश बुटके यास ऑटो मध्ये बसवून त्वरीत सरकारी हॉस्पिटल, यवतमाळ येथे भरती केले, तेंव्हा डॉक्टर यांनी सांगितले तुम्ही पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्याचे प्राण वाचले, सदर कार्याबद्दल पेशंट यांचे मित्र व नातेवाईक यांनी ट्रॅफिक पोलिस निलेश झाडे यांनी तत्परता दाखवून प्रवाशी यास दवाखान्यात दाखल केल्या बद्दल आभार मानून अभिनंदन केले. तसेच सदर कार्याबद्दल पोलिस अधीक्षक श्री. कुमार चिंता सर यांनी पो. हवा. निलेश झाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.