
अमिन शाह
बुलढाणा : देऊळगावराजा तालुक्यातील ग्राम मेव्हणा
राजा शिवार गट नंबर 319 येथे तूरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी एलसीबीने धडक कारवाई केली. विष्णू सुखदेव बोरुडे 39 वर्ष रा. मिळणारा तालुका देऊळगाव राजा असे आरोपीचे नाव आहे. गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जाते. दरम्यान पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव, उपविपोअ देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व स्थानिक गुन्हे शाखेची टिम यांनी मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे 15 डिसेंबर रोजी पोस्ट देऊळगाव राजा हद्दीमध्ये ग्राम मेव्हणा राजा शिवारात आरोपी याच्या मालकीचे शेतामध्ये त्याने अवैधरित्या तुरीच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अवैधरित्या अमली पदार्थ असलेले गांजा या झाडाचे लागवड करुन संगोपन करून मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाहीस्तव पो.स्टे. देऊळगाव राजा यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपी विरुद्ध अप क्र. /2025 कलम 20 (अ) NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुद्देमाल
मादक पदार्थ गांजाचे ओलसर झाडे वजन 28 किलो 51 ग्राम किमत 2,85,100 रुपये व गांजाचे सुकलेले झाडे वजन 04 किलो 700 ग्रॅम किंमत 94,000 रुपये असा एकूण 3,85,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कार्यवाही पथक !
API यशोदा कणसे,
Asi राजकुमार राजपूत,
HC. गजानन दराडे. आदिच्या पथकाने केली ,











































