Home बुलडाणा लग्नासाठी जात असलेल्या पति पत्नीवर काळाचा घाला दोघांचे मृतदेह सापडले ,

लग्नासाठी जात असलेल्या पति पत्नीवर काळाचा घाला दोघांचे मृतदेह सापडले ,

458

 

पोलिस तपास सुरु ,

बुलडाणा ,

तेलंगणातून पाचोरा येथे आयोजित एका लग्न समारंभा साठी जात असलेल्या दाम्पत्याची भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरीत कोसळली. यामध्ये पती आणि पत्नीचा मृत्यू झाला.ही घटना 29 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे.
जळगांव खांदेश जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे राहणारे परंतु नोकरीनिमित्त तेलंगणात वास्तव्यास असलेले पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील हे पती-पत्नी विवाह सोहळ्यासाठी स्वतःच्या कारने तेलंगणाहून पाचोऱ्याला जात होते. दरम्यान, शुक्रवारी ते जळगाव खांदेश येथे पोहचणे अपेक्षीत होते. मात्र ते पोहचले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. या बाबत नादुरा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांचे शेवटचे लोकेशन हे वडनेर भोलजी शिवारात दाखवत होते. अखेर शनिवारी या दाम्पत्याची कार वडनेर भोलजी शिवारात असलेल्या एका पडक्या विहीरीत आढळली. तसेच या अपघाता मध्ये पती पत्नीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तेलंगणा राज्यातील सुर्यपेठ जिल्ह्यात झुआरी सिमेंट कंपनीत ते गत ५ वर्षांपासून नोकरीला होते.

घातपात नव्हे अपघात ,

लग्नासाठी जात असलेल्या पति पत्नी चा अपघात झाला असून गाड़ी रसत्याच्या खाली विहरित पडली आहे याचे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांना सापडले आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधि शी बोलतांना दुय्यम ठानेदार स्वप्निल नाईक यांनी दिली आहे ,