
एकनाथ माळेकर
चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी मेरा बु . येथे. दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणा, शाखा मेरा बु. व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता सप्ताह निमित्त ग्रामपंचायत मेरा बुद्रुक कार्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मेरा बु. च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.अनिता ताई वायाळ तर प्रमुख पाहुणे अनिल बंगाळे साहेब मुख्यालय बुलढाणा तसेच विनायक पाटील पडघान माजी सभापती जी. प.बुलढाणा, अशोक पाटील पडघान माजी सभापती पं.समिती चिखली,दिनकर भाऊ डोंगरदिवे माजी जी.प.सदस्य पती आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बँकेच्या कामकाजाविषयी बंगाळे यांनी परिसरातील लोकांना मार्गदर्शन केले तर अशोकराव पडघान यांनी परिसरातील सर्व ग्राहकांनी जिल्हा सहकारी बँक व नाबार्ड चा फायदा घेऊन आपले जीवनमान उंचावले पाहिजे कार्यक्रमाच्या ठिकाणी काढले आहे तसेच या सुवर्णसंधीचा परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा आसे आव्हान कार्यक्रमाच्या ठिकाणी केले आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. हळदे साहेब रोखपाल शाखा मेरा बु. यांनी केले. आर्थिक आणि डिजिटल साक्षरता व जिल्हा बँक बळकटीकरण याविषयी श्री बंगाळे साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले . विनायक पाटील पडघान यांनी कार्यक्रमा निमित्त उपस्थित गावकऱ्यांनी आपले सर्व व्यवहार जिल्हा बँकेत करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमासाठी शाखा व्यवस्थापक श्री पठाण साहेब श्री हळदे साहेब श्री शत्रुघ्न खेडेकर गटसचिव श्री निकाळजे साहेब शाखेचे शिपाई गजानन भाऊ पडघान यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमानिमित्त वै.चालू ठेव खाते 1 सभा. रू.178000/- वै.बचत ठेव खाते 5 सभा. 53000/-रू. वै. कल्याणकारी मुदती ठेव 3 सभा.176000/-तसेच या कार्यक्रमानिमित्त 2 सभासदांना Q R Code चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन श्री. मसूद पठाण शाखा व्यवस्थापक मेरा बु यांनी केले आहे











































